अजिंक्य मेडशीकर
तालुका प्रतिनिधी मालेगांव
वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर डॉ भागवत कराड केंद्रीय अर्थमंत्री भारत सरकार हे असताना त्यानी वाशिम येथील सुप्रसिद्ध डॉ चंद्रकांत घुगे यांच्या निवासस्थानी भेट दिली.याचे औचित्य साधुन मेडशी येथील शेतकरी अजिंक्य मेडशीकर यांनी मेडशी मंडळातील सोयाबिन पिकाचे येलो मोझकमुळे मर्यादापेक्षा जास्त नुकसान झाले असून ह्या गंभिर विषयावर सखोल चर्चा करत त्यांना पंतप्रधान विमा योजने अंतर्गत सदर रोगाचा समावेश करत तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी निवेदाद्वारे केली.मालेगांव तालुक्यातील मेडशी मंडळाला मागील तीन वर्षांपासून जसे ग्रहण लागले आहे.दरवर्षी कोणत्या ना कोणत्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतातील उभ्या पिकाचे आतोनात नुकसान होत आहे.मेडशी मंडळात सोयाबीन पिकाचा पेरा हा 98% पेक्षा जास्त असून सलग तीन वर्ष ओल्या दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्याचे या वर्षी सोयाबिनचे पीके चांगल्या अवस्थेत होते.पाऊस कमी प्रमाणात किंवा मुबलक नसला तरी सोयाबीनचे पिके सरासरी अवस्थेत होते.त्यामूळे या वर्षी तरी चांगले उत्पन्न होईल.या आशेवर शेतकरी बांधवांनी शेतातील पिकाला खूप खर्च केला.व पोटच्या लेकरा प्रमाणे जपलं.मात्र ऐन सोयाबीन भरण्याचा वेळी येलो मोझक, मूळकूज,खोडकुज सदृश्य आजाराने सर्वच्या सर्व जमिनी वरील सोयाबीन प्रभावित होऊन पिवळे पडले व मुदतपूर्व अपरिपक्व अवस्थेत होरपळून वाळले.त्यामुळे उत्पन्नात लक्षणीय घट येण्याचे चिन्ह असून सदर रोगाची व्याप्ती ही खूप मोठ्या प्रमाणात असून सदर सोयाबीन पिकाचे नुकसानीचे पंचनामे करून पंतप्रधान विमा योजने अंतर्गत करून मेडशी मधील शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.


