अतिश वटाणे
ग्रामीण प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला संलग्नित कृषि महाविद्यालय उमरखेड येथील सातव्या सत्राच्या कृषि विद्यार्थीनी कु. तनया बोबडे, स्नेहल तुळसे , वैष्णवी चप्पलवाड, मयुरी वासनिक, शुभांगी मदने आणि पुनम कोकणे यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत नागापूर येथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया कशी व कोणत्या पिकास करावी, सोयबीन, कापूस, मका इत्यादी पिक उत्पादन वाढीस पेरणी पूर्व बिजप्रक्रीया फायदेशीर असते उगवणशक्ती वाढते व किटकांपासून संरक्षण
करते अशाप्रकारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात झाले. बियानांवर रायझोबियम ट्रायकोडर्मा व जिब्रेलिक एसिडची बिजप्रकिया केली व पेरणीपूर्व बिजप्रक्रीयेची प्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आली. पेरणीपूर्व बिजप्रक्रीया प्रात्यक्षिकास कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य एस. के. चिंतले सर, ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमाचे प्रमुख तसेच विषयतज्ञ वाय. एस. वाकोडे सर या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. यासाठी गावाचे सरपंच ठेंगे साहेब व शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती नोंदविली.