संजय भोसले
तालुका प्रतिनिधी , कणकवली
योगासन हे भारताने जगाला दिलेली देणगी आहे. योगासनाने मन,शरीर आणि बुद्धी नेहमी ताजीतवानी रहाते.तसेच आत्मिक आणि शारिरिक उर्जा प्राप्त झाल्याने मन एकाग्र होते वअभ्यासात प्रगती होते.योगासने आणि खेळ हा मुलांच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग असून, खेळ खेळल्यामुळे मुलांच्यात खिलाडूवृत्ती,संघटन कौशल्य,सहकार्यवृती, यासारख्या अनेक गुणांचा विकास होण्यास मदत होते.विशेष म्हणजे योगासनाने व्यक्तीच्या मनावरील ताणतणाव कमी होतो, म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी चांगल्या आरोग्यासाठी आणि सुदृढ शरीरासाठी तसेच आनंदी जीवन जगण्यासाठी खेळात सहभागी होवून आनंद घ्यायला हवा. असे आवाहन स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे. यांनी जिल्हास्तरिय योगासन स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी केले.तर जिल्हा क्रिडा अधिकारी, विजय शिंदे. यानी स्पर्धेच्या ठिकाणी भेट देऊन विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले. स्पर्धकांना सदिच्छा देताना ते म्हणाले की योगासनाने शरीर निरोगी बनते. एकदा का शरीर निरोगी बनले की “निरोगी शरीरात निरोगी मन वास्तव्य करते,आणि निरोगी मनाला कसलेच भय नसते”. पण यासाठी योगासनाच्या सरावात सातत्य हवे.आपल्या जिल्ह्याचे विद्यार्थी राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकावेत हिच सदिच्छा.सिंधुदुर्ग जिल्हास्तरिय योगासन स्पर्धेचे आयोजन कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डेच्या डिजीटल हाॅलमध्ये करण्यात आले. उद्घाटन सोहळ्याला कासार्डे विकास मंडळ, मुंबईचे उपसचिव आनंद कासार्डेकर, स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे,पदाधिकारी प्रभाकर कुडतरकर, कार्यवाह रविंद्र पाताडे, पर्यवेक्षक एन.सी.कुचेकर,तालूका क्रिडा समन्वयक बयाजी बुराण,कासार्डे विद्यालयाचे क्रिडा शिक्षक दत्तात्रय मारकड तसेच विविध विद्यालयाचे क्रीडा शिक्षक, जिल्ह्र्यातील योगा स्पर्धकांचे पालक मोठ्या संखेने उपस्थित होते.सदरच्या स्पर्धा एकूण तीन गटांमध्ये खेळवण्यात आल्या. यामध्ये 14 वर्षाखालील मुले व मुली ,17 वर्षाखालील मुले व मुली आणि 19 वर्षाखालील मुले व मुली .तसेच या योगासन स्पर्धा ट्रॅडिशनल ,आर्टिस्टिक आणि रिदमिक या योगा प्रकारांमध्ये घेण्यात आल्या असून विविध स्पर्धकांनी यात सहभाग नोंदवला होता. सदर स्पर्धा सलग दोन दिवस चालल्या असून यामध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले या स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे.
१४वर्षा खालील मुली:- ( ट्रॅडिशनल प्रकार)
१)दुर्वा प्रकाश पाटील.कासार्डे हायस्कुल. प्रथम क्रमांक,
२)दूर्वा मिलिंद अखेरकर. द्वितीय क्रमांक, पेंडूर हायस्कूल
३)अनुष्का अभिजीत आपटे. तृतीय क्रमांक, पोदार हायस्कूल.
४) श्रेया रामचंद्र डोईफोडे. एस एम हायस्कूल कणकवली, चौथा क्रमांक.
५) काव्या मुक्तानंद गवंडळकर. पोदार हायस्कूल, पाचवा क्रमांक.
१४वर्षा खालील मुलगे.:- ( ट्रॅडिशनल प्रकार)
१) रोहन विलास गावडे.पेंडूर हायस्कूल, प्रथम क्रमांक.
२) कल्पेश उदय निकम. कासार्डे हायस्कूल, द्वितीय क्रमांक.
३) समर्थ रुपेश वारके. आंबोली हायस्कूल, तृतीय क्रमांक.
४) कुणाल मुक्तानंद गवंडळकर. पोदार हायस्कूल, चौथा क्रमांक.
५) भावेश धोंडी घाडीगावकर. आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल, पाचवा क्रमांक
१७वर्षा खालील मुली : ( ट्रॅडिशनल प्रकार)
१) सानवी केशव कुराडे. विद्यामंदिर हायस्कूल कणकवली, प्रथम क्रमांक
२) हर्षिता अजित सावंत. आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल, द्वितीय क्रमांक.
३) आर्या गोविंद फाटक. आयडियल मिडीयम स्कूल, तृतीय क्रमांक.
४) कृतिका राजेंद्र पंदारे.पेंडूर हायस्कुल, चौथा क्रमांक .
५)आदिती अर्जुन पेढूरकर. पेंढूर हायस्कूल, पाचवा क्रमांक.
१७वर्षा खालील मुलगे
(ट्रॅडिशनल प्रकार)
१) युग गणपत पंदारे .पेंडूर हायस्कूल, प्रथम क्रमांक
२) मयूर सुभाष हाडशी. कासार्डे हायस्कूल, द्वितीय क्रमांक.
३) सचिन संपदा तेली. आंबोली हायस्कूल, तृतीय क्रमांक.
४) आर्यन सुरेश वारके. आंबोली हायस्कूल, चौथा क्रमांक.
५) रुद्र राजेंद्र ढगे. आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल, पाचवा क्रमांक.
१९ वर्षाखालील मुली
(ट्रॅडिशनल प्रकार)
१) सानिका प्रवीण मतलवार कासार्डे जुनिअर कॉलेज कासार्डे, प्रथम क्रमांक.
२) गौरवी राघोबा मिठबावकर. वराडकर विद्यालय, द्वितीय क्रमांक.
३)श्रावणी राजेंद्र मराठे. आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल, तृतीय क्रमांक.
४)ईशा म्रिणाल कीर्तनीया. आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल, चौथा क्रमांक.
५) समृद्धी प्रशांत सावंत. आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल, पाचवा क्रमांक.१९ वर्षाखालील मुलगे (ट्रॅडिशनल प्रकार)
१)राजाराम चंद्रहास सावंत. महाविद्यालय कट्टा, प्रथम क्रमांक.
१९ वर्षाखालील मुली
(रिदमिक योगा)
१)सानिका प्रविण मत्तलवार. कासार्डे ज्युनियर काॅलेज कासार्डे, प्रथम क्रमांक.
अशा प्रकारे स्पर्धा निकाल असून स्पर्धा संपल्यानंतर त्याच ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते विजयी स्पर्धकांचा गुणगौरव करण्यात आला.या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक , सुत्र संचालन आणि आभार कासार्डे विद्यालयाचे जेष्ट शिक्षक संजय भोसले यांनी मानून खेळाडुंना शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेला योगा जज्ज म्हणून संजय भोसले, श्वेता गावडे,तेजल कुडतरकर, प्रियांका सुतार , नवनाथ काणकेकर आदीनी उत्तम कामगिरी बजावली आहे.
सलग दोन दिवस सुरू असलेल्या यास्पर्धेला जिल्ह्यातील विविध शाळांमधून ८० पेक्षा अधिक खेळांडुंनी सहभाग घेतला होता. कासार्डे शिक्षण संस्था, प्राचार्य व विद्यालयाच्या संपूर्ण टीमने सदर स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी विशेष मेहनत घेतली त्या बद्दल मान्यवरांचे तर्फे सर्वांचे विशेष आभार मानले. व विभागस्तरीय योगासन स्पर्धेसाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या.