भगवान कांबळे
तालुका प्रतिनिधी माहुर
माहुर – साडे तीन शक्ती पिठा पैकी एक पुर्ण पीठ असलेल्या श्री रेणुकादेवी च्या नवरात्र महोत्सवाला रविवार पासुन सुरुवात भाविकांचे सुलभ व सहज दर्शन व्हावे म्हणून सर्वच विभागांचे सुक्ष्म नियोजन व प्लास्टिक मुक्त नवरात्र महोत्सव साजरा करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला श्री रेणुकादेवी संस्थान चे पदसिद्ध अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश नागेश न्हावकर , जिल्हा अधिकारी अभिजित राऊत, संस्थान चे पदसिद्ध सचिव कार्तिकेयन एस, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ खंडेराव धरणे, कोषाध्यक्ष तथा तहसीलदार किशोर यादव, उपविभागीय पोलिस अधिकारी दादासाहेब सिनगारे, माहुर नगरीचे नगराध्यक्ष फिरोज दोसाणी आदी उपस्थित होते महामंडळाच्या १०० बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच खाजगी वाहनांना गडावर जाण्यास प्रतिबंध करुन तळापासूनच महामंडळाच्या बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. वाहतूक नियंत्रक हे टी पॉइंट दत्त शिखर, अनुसया, पेट्रोल पंपासमोर वाहतूक नियंत्रण कक्षातुन विशेष खबरदारी घेणार आहेत अतिरिक्त चालक वाहकांची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे आगर प्रमुख चंद्रशेखर सम्मलवाड यांनी सांगितले आरोग्य विभागातर्फे देवदेश्वर संस्थान, रेणुकामाता मंदिर गडावर, दत्त शिखर, अनुसया माता मंदिर येथे आरोग्य पथक तैनात करण्यात येणार आहे २४ तास तज्ञ् डॉक्टरस व रुगण वाहीका उपलब्ध केली जाणार आहे माहुर ग्रामीण रुग्णालयात विविध आजारांचे तज्ञ् डॉक्टरस सेवा देणार आहे पाचशे पोलीसांकडून बंदोबस्त एक अप्पर पोलीस अधीक्षक, एक उपविभागीय पोलिस अधिकारी,सहा पोलिस निरीक्षकांसह, पाचशे कर्मचारी नवरात्र महोत्सवा दरम्यान बंदोबस्तासाठी तैनात असतील अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक धरणे यांनी दिली आहे शारदीय नवरात्र महोत्सव २०२३च्या कार्यक्रम पत्रिकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी रेणुकादेवी संस्थान चे विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय काण्णव, विनायक फादांळे, अरविंद देव, बालाजी जगत,दुर्गादास भोपी, आशिष जोशी, व्यवस्थापक योगेश साबळे, आदी उपस्थित होते .