आकाश बुचुंडे
ग्रामीण प्रतिनिधी मारेगाव
मारेगाव : मारेगाव तालुक्यातील आपटी येथील नवतरुण युवकची गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १२ ऑक्टोबरला दुपारी २ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. प्रज्वल मोहन बोढे ( अंदाजे वय २० ) असे गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या नवतरुण शालेय विद्यार्थ्याचे नाव आहे. प्रज्वलने आज गुरुवारी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र त्याच्या आत्महत्याचे कारण कळू शकले नाही. तो वरोरा येथील आनंदवन बि ए प्रथम वर्षाला शिक्षण घेत होता, त्याने असे टोकाचे पाऊल उचलल्याने आपटी परिसरात हळहळ व्यक्त होत असून मित्र परिवारात शोककळा पसरली आहे. वृत्त लिहे पर्यंत संबंधित विभाग दाखल व्हायची होते.
त्याच्या पाठीमागे वडील, आई बहीण असा आप्त परिवार आहे.