मनोज गवई
तालुका प्रतिनिधी चांदुर रेल्वे
चांदूर रेल्वे : स्वच्छ व सुंदर शहर या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान राबविण्यात येत आहे चांदूर रेल्वे एक बस स्थानकाला सुद्धा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियाना अंतर्गत बस स्थानक स्वच्छता निरीक्षण व मूल्यांकन यासाठी चांदुर रेल्वे आगाराला स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियानांतर्गत मूल्यांकन समितीची भेट झाली. यावेळी चंद्रपूर आगाराच्या विभाग नियंत्रक स्मिता सुतवणे, विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी चंद्रपूर रोहिणी देवानंद पुलमवार कनिष्ठ अभियंता चंद्रपूर संदीप क्षीरसागर, मूल्यांकन समिती सदस्य पत्रकार बंडु आठवले यांनी भेट देऊन स्वच्छतेबाबत आगारातील अनेक ठिकाणच्या भेटी घेऊन समाधान व्यक्त केले.
यावेळी आगार व्यवस्थापक अनिकेत बल्लाळ बस स्थानक प्रमुख मनीष वैद्य उपस्थित होते.
मूल्यांकन समितीने संपूर्ण बस स्थानक परिसराची पाहणी करून समाधान व्यक्त केले. सोबतच आगार प्रमुखाला काही सूचना देऊन आणखी बस स्थानक कसे चांगले करता येईल यासाठी प्रयत्न करून शहरातील नागरिकांनी सुद्धा बस स्थानकाच्या परिसरात सुशोभित करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन आगार नियंत्रक अनिकेत बल्लाळ यांनी केले आहे.