किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
सोन्याची नगरी,संताची नगरी पातुर ची ओळख करून देते.आणी या पातुर शहरातून शेगावचे संत गजानन महाराज यांची पालखी पातुर मार्गाने जात असते.परंतु कोरोनामुळे या परंपरेवर विर्जन पडले आहे.
गेली वर्षानुवर्षे पंढरीच्या विठोबाच्या भेटीला ,दर्शनाला अनेक भाविक पंढरपूर वारी ला जातात,ही परंपरा पिढ्यानपिढ्या अशीच सुरू आहे, यापुढेही सुरूच राहील, दरम्यान महाराष्ट्रातील सर्व संतांच्या पालख्या आषाढी एकादशी निमित्य पंढरपूर ला आपल्या पालखी व भविकांसह विठुरायाच्या दर्शनाला जातात. यामध्ये विदर्भाची पंढरी असलेले ,श्री संत गजानन महाराज शेगाव ,यांची मानाची पालखी सुद्धा सहभागी असते,तेव्हा पालखी शेंगाव येथून होऊन अनेक ठीकानांवरून मार्गस्थ होते.
दरम्यान पातूर येथे हा पालखी सोहळा पातूर पंचायत समिती येथे मुक्कामी असतो, सर्व पंचक्रोशीतील भाविक भक्त याठिकाणी श्रींचे दर्शनास येतात. व दुसऱ्या दिवशी सकाळी 5 ला महाआरती अभिषेक झाल्यानंतर ,हा पालखी सोहळा पुढील मुक्कामाकडे मार्गस्थ होतो, तत्पूर्वी पातूर घाट येथे पालखी येत असता सर्वत्र भक्तमंडळी कडून ,आपल्या स्वखर्चातून ,वारकरी मंडळींना चहा,दुध,अल्पोपहार, फळ,मिठाई,इत्यादी पदार्थाचे वाटप सुद्धा करतात,,, याच वेळी पातूर घाटातून पालखी सोहळा मार्गस्थ होत असताना घाटातील नयनरम्य दृश्य पाहण्यास उपस्तीत असतात. (जणू काही हा नजारा म्हणजे दिवे घाटातील दृश्याप्रमाणेच असतो)
परंतु 2020 पासून सुरू असलेल्या कोरोना महामारी मुळे व शासनाच्या नियमांचे पालन व्हायला हवे,यासाठी सर्व पालखी सोहळे ही ,संस्थान मधून थेट पंढरीला रवाना होत आहेत,
परिसरातील सर्व नागरिक येत्या काळात या नयनरम्य दृश्य पाहण्याची उत्सुकता असून, ही दृश्य पाहण्याच्या वेळेची वाट ओहत आहे
……….अजिंक्य प्र निमकंडे