पवनसिंग तोडावत
ग्रामीण प्रतिनिधी अंधानेर
कन्नड 17 : आज रोजी कन्नड तालुका संगणक परिचालक संघटनेच्या वतीने घरकुल संदर्भात निवेदन डोंगरे सर यांना देण्यात आले, pmay योजने अंतर्गत प्रपत्र ड आधार कार्ड जॉब कार्ड मॅपिंग चालू आहे सदरील काम हे आपले सरकार सेवा केंद्र चालक यांच्या मार्फत केले जात आहे सदरील काम हे आपले सरकार सेवा केंद्र चालक यांना बंधनकारक नसतानाही आपल्या आदेशानुसार करत आहे पण काही ठिकाणी प्रपत्र ड मध्ये लाभार्थीचे नाव सिस्टीम मध्ये वगळत आहे. यामुळे गावातील ग्रामपंचायत पदाधिकारी ,ग्रामस्थ याचा असा गैरसमज होत आहे सदरील नाव हे आपले सरकार सेवा केंद्र चालकाने वगळले आहेत त्या कारणाने आपले सरकार सेवा केंद्र चालकास शिवीगाळ व मानसिक त्रास होत आहेत. जो पर्यंत पंचायत समिती स्तरावरून पत्र निघत नाही तो पर्यंत कोणीही काम करणार नाही असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी तालुकाध्यक्ष विवेक देवरे पाटिल ,उपाध्यक्ष अमोल भुसारे, सचिव सागर पवार, महिला अध्यक्ष प्रतिज्ञा कुलकर्णी महिला उपाध्यक्ष विजया जाधव सह, तालुक्यातील पदाधिकारी व संगणक परिचालक मोठया संख्येने उपस्थित होते


