वसंता पोटफोडे
शहर प्रतिनिधी राळेगाव
शहरातली भारतीय सैन्य दलात बावीस वर्षे सेवा देऊन भारतीय सीमेचे रक्षण करणारे गुरुदास नगराळे हे सेवानिवृत्त होऊन राळेगाव शहरात स्वगृही परत आल्याने गुरुदास नगराळे यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक शहराच्या प्रमुख मार्गाने काढण्यात आली व नंतर भारतीय सैनिक गुरुदास नगराळे यांचा नागरी सत्कार लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्या समोर घेण्यात आला यावेळी कार्यक्रमांसाठी राळेगाव येथील तहसीलदार अमित भोईटे पोलीस उप निरीक्षक मोहन पाटील सत्कार गुरुदास नगराळे व त्यांचे कुटुंब सोबतच नगरसेवक बाळु धुमाळ, दिलीप दुधलिकर, पुष्पाताई कन्नाके, माजी प्राचार्य सुरेंद्र ताटे,माजी सैनिक धुर्वे व ज्येष्ठ नागरीक संघटनेचे मधुकर गेडाम व तालुक्यातील सर्व माजी सैनिक उपस्थित होते यावेळी राळेगाव येथील गुरुदास नगराळे मित्र परिवार, नवोदय क्रीडा मंडळ ,आदर्श दुर्गाउत्सव मंडळ व शहीद भगतसिंग गृप व सोबत शहरातील नागरिक यांनी प्रमूख पाहुण्याच्या उपस्थितीत गुरुदास नगराळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तहसीलदार अमित भोईटे यांनी सैन्य दलातील सैनिक हे आपले कुटुंब मित्र परिवार यांच्या पासून दुर राहून भारत सीमेचे रक्षण करतात त्यामुळे त्यांचा सत्कार करण्याचे भाग्य मला नवोदय क्रीडा मंडळामुळे लाभत आहे हा शन माझ्यासाठी पेरणादायी आहे असे त्यांनी भाषणात सांगितले.सोबत राळेगाव येथील पोलिस उप निरीक्षक मोहन पाटील यांनी वर्दीचे महत्व उपस्थीत नागरीकांना व खेळाडूंना सांगितले.सोबतच एक देशभक्तीचे गीत सादर करून सत्कार मुर्ती गुरुदास नगराळे यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या सोबतच भारतीय सैनिक गुरुदास नगराळे यांनी सत्काराला उत्तर देताना आपला देशसेवेतील बावीस वर्षाचा अनुभव सांगितला व सोबतच नवोदय क्रीडा मंडळ आदर्श क्रिकेट क्लब यांचे मोठे मार्गदर्शन लाभले व राळेगाव मध्ये माझ्या कुटुंबाला कोणताही त्रास झाला तर मित्र परिवार यांनी मी हजर नसतांना देखील मदत केली असे बोलून दाखवले, यावेळी शहरातील स्नेहा शिवरकर या मुलीचा एम बी बी एस साठी यवतमाळ येथील शासकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला असल्याने तिला मदत म्हणून जिल्हा परिषद मुलाच्या शाळेचे मुख्याध्यापक गोविंद धोटे यांनी लॅपटॉप दिला व तलाठी मोहन सरतापे यांनी पाच हजार रुपयांची आर्थिक मदत केली. हि सर्व मदत तहसिलदार अमीत भोईटे यांच्या हस्ते स्नेहा शिवरकर हिला देण्यात आली.या कार्यक्रमासाठी नवोदय क्रीडा मंडळाचे प्रमुख महेश भोयर, वरिष्ठ खेळाडू नंदकुमार जयसिंगकार, विजय झाडे, रमेश बोभाटे, सुजित बेहरे, फिरोज लाखांनी,गोपाल मश्रू, विरेंद्र वारेकर, दीपक पेंदे, गजानन बलांद्रे, प्रवीण गीरी, सचिन एकोनकर राजु नगराळे, सागर जुमणाके, नरेश दुर्गे, प्रफुल्ल खडसे, गणेश काळे, मोणू खान, सुरुज भगत, सूरज उजवणे, सचिन डोंगरे, सोनु खान, महेश राजकोल्हे, राहुल कन्नाके,प्रक्षिक जिवणे, लोकेश कुबडे, क्षितिज नगराळे, अंकित क्षीरसागर, आर्यन देवकर, जय डोंगरे, जगदीश नोकोडे, प्रशांत शेंदरे, मयुरी चौधरी, आचल सावसाकडे व नवोदय क्रीडा मंडळाचे सर्व खेळाडू उपस्थीत होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनय मुनोत यांनी केले तर संचालन प्रा, अशोक पिंपरे व आभार प्रदर्शन नवोदय क्रीडा मंडळाच्या वतीने केले या कार्यक्रमाचे आयोजन गुरुदास नगराळे मित्र Rdपरिवार व नवोदय क्रीडा मंडळ यांनी केले होते.

