सोपान सासवडे
ग्रामीण प्रतिनिधी अहमदनगर.
स्वच्छता ही सेवा हा संदेश जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढोरजळगाव ने येथील इयत्ता पहिली ते चौथीच्या मुलांनी दिला. शाळेचा परिसर ,विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा परिसर ,मारुती मंदिराचा परिसर, शनिदेव मंदिराचा परिसर, मुलांनी व शाळेतील शिक्षकांनी स्वच्छ केला. शाळेचे मुख्याध्यापक धर्मेंद्र शिर्के सर यांनी मुलांना स्वच्छतेचे महत्व समजावून सांगितले. राजेंद्र शेळके सर यांनी मुलांना स्वच्छतेचे फायदे व तोटे तसेच आपल्या घराबरोबरच शाळेची स्वच्छता तसेच आपल्या परिसराची स्वच्छता व गावाची स्वच्छता ही प्रत्येकाची जबाबदारी आहे असे मुलांना समजावून सांगितले. यावेळी मोरे मॅडम, चौरे मॅडम,सरपंच गणेश कराड, अनंता उकिरडे, भाऊसाहेब उगले, सुखदेव कराड, सोपान नवले ,मधुकर कराड ,कानिफ उकिरडे , ओम रासने ,देविदास कराड,आदी उपस्थित होते. एक तास श्रमदान झाल्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री रवींद्र डाके यांनी मुलांना खाऊ वाटप केले.