आकाश बुचुंडे
ग्रामीण प्रतिनिधी मारेगाव
मारेगाव : मारेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या पहापळ येथील अनेक जनावरांना लम्पी रोग प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येत असून यात तीन बैल मरण पावली तर, दहा जनावरे लंपीने ग्रस्त आहेत. अशी धक्कादायक माहिती समोर आली. यामुळे गांव बाधित क्षेत्र म्हणून घोषित होण्याच्या मार्गांवर असल्याचे चित्र दिसून येत आहे. सध्या शेतीचा हंगाम सुरु आहे अशातच लंपी ची लागण येथील अनेक जनावरांना होऊन यात तीन बैल दगावल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. जोडी पैकी प्रत्येकी एकऐक बैल मरण पावलेल्या शेतकऱ्यांची नामे दुष्यन्त लांबट, प्रल्हाद चौधरी, फकरू निखाडे यांचे ते आहेत. तर दहा जनावरे लंपी आजाराने ग्रस्त आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना शेती च्या पुढील मशागतीची चिंता लागली असून या लम्पीचा संभाव्य प्रसार रोखण्यासाठी तालुक्यातील पशुपालक तसेच क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी कर्मचारी यांनी मार्गदर्शन करणे व शंकाचे निरसन करणे यासाठी विभागनिहाय पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समितीतील सर्व गांवे यांची संपर्क अधिकारी म्हणून नेमणूक करणे अतिशय आवश्यक झाले आहे. तूर्तास येथील पशुधनाची वेळीच उपचार मिळाल्याशिवाय जनावराला लंपी आजाराची लागण होण्यापासून वाचविता येणार आहे. त्यामुळे संबंधित विभागाने या गंभीर आजाराच्या प्रादुर्भावावर तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचे गोधन दगावलेल्या शेतकऱ्यांनी बोलताना सांगितले आहे.