शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी
सेलू : दि.01 सेलू ते वालूर मार्गे हातनूर ही बस तात्काळ सुरु करावी, अन्यथा रास्तारोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संतप्त विद्यार्थ्यांनी पाथरी आगारप्रमुखांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.सेलू ते वालूर मार्गे हातनूर ही बस गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. हातनूर, साळेगाव, खेर्डा येथील शेकडो विद्यार्थी ज्ञानार्जना साठी वालूर येथे रोज जातात. बस बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. चालू असलेली बस बंद का केली? असा संतप्त सवाल या प्रवाशांनी उपस्थित केला असून सेलू-वालूर मार्गे हातनूर ही बस ताबडतोब सुरू करण्यात यावी.अन्यथा मोरेगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संतप्त विद्यार्थ्यांनी पाथरीच्या आगार प्रमुखांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.दरम्यान, यावेळी जयसिंग शेळके, अभिषेक आंधळे, तुकाराम निर्वळ, दिपक घिसे, शैलेश राऊत, ओंकार गोरे, कृष्णा आंधळे, प्रतिक आबूज, युवराज माळवोदकर, अर्जून आंधळे, ओमकार आंधळे, नागेश गोरे, तनमय नागटीळे, विठ्ठल चव्हाण, विठ्ठल निर्वळ यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.


