शेख इरफान
जिल्हा प्रतिनिधि यवतमाळ
यवतमाळ : मराठा कुणबी समाजातील मुला मुली मध्ये क्षत्रीय स्वभाव गुणामुळे युवकांना भडक वागणे आणि राग अनावर न होणे असे होतांना दिसत आहे, स्वभावाला मुरड घालण्यासाठी आणि खोटी प्रतिष्ठा डोक्यातून बाहेर काढायचे असेल तर आपण आपल्या territory च्या बाहेर कार्य केल्यास स्वाभाविकच जीभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ राहून आप आपल्या कार्यामध्ये जास्त लक्ष्य केंद्रित करण्यास मदत होईल. आज युवकांमध्ये बेरोजगारी, राजकीय कार्यकर्ते होण्याचे आणि व्यसनाधीन होण्याचे प्रमाण वाढले आहे. आपल्या बुद्धीमते प्रमाणे स्पर्धा परीक्षा क्रॅक करू न शकणाऱ्या युवकांनी वेळे चे महत्व ओळखून वेळीच मार्ग बदलावा आणि इतरत्र आपल्या कुवती व आवडी प्रमाणे आपल्या कडे असलेल्या भांडवल पाहून स्व:मरोजगार किंवा उद्योग निवडावा, सेवा क्षेत्रामध्ये भरपूर संधी आहेत. अगोदर अनुभव घ्यावा आणि नंतरच कर्ज घेऊन व्याप्ती वाढवावी , यातच यश आहे.या सर्व कारणामुळे मराठा कुणबी समाज मागे पडत असून नष्ट होण्याच्या मार्गावर आहे त्यासाठी युवकांनी विद्यार्थ्यांनी परंपरागत क्षेत्रातून बाहेर पडून नव्या संधीकडे पाहून यशस्वी होण्यासाठी कार्य करावे असे प्रतिपादन कुणबी मराठा समाज पुसदच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार मध्ये डॉ . विजयराव माने यांनी केले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री दिगंबर जगताप यांनी समाजाच्या विकासासाठी सर्वांनी हातात हात घेऊन काम करावे असे विचार मांडले. कठोर परिश्रमांना ज्ञान व कौशल्याची जोड देणे आवश्यक आहे असे विचार आयुक्त एकनाथराव पावडे यांनी मांडले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दिगंबर जगताप सर प्रमुख उपस्थितीत विजयराव माने एकनाथराव पावडे जीएसटी अधिकारी यवतमाळ डॉ स्वप्निल देशमुख खेडकर सर डॉ भानुप्रकाश कदम डॉ ठाकरे प्राचार्य हेमंत महल्ले निवासी नायब तहसीलदार देशमुख मॅडम इंजिनीयर सचिन नरवाडे यूएसए इत्यादी प्रमुख उपस्थितीच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमांमध्ये 45 विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांची सत्कार घेण्यात आले यामध्ये नीट जे डबल इ व एमपीएससीतील अधिकारी तसेच खेळाडूंचे सत्कार घेण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुशांत महाले तसेच आभार अमोल जगताप सर यांनी केले या कार्यक्रमासाठी मराठा कुणबी समाजातील शंकर गावंडे दीपक काळे सुरेश वानखेडे मनोज ठाकरे सचिन सुरोशे सोनू पाटील गोपाल सुरोशे संदीप पाटील मेरा प्रदीप गावंडे रवी घड्याळे ज्ञानदेव बांडे सचिन सवयी संतोष भेंडे व असंख्य मराठा कुणबी समाजातील समाज बांधवांनी हा कार्यक्रम यशस्वी केला तसेच पुसद नगरीतील मराठा कुणबी समाज बांधव या कार्यक्रमासाठी उपस्थित होते
चौकट :
कोंबडी ज्याप्रमाणे दुसऱ्या कोंबडीचे अंडे आपल्या पोटाखाली घेऊन त्याला ऊब देऊन पिल्ले जन्मास घालते, तशाच प्रमाणे ज्या लोकांच्या मुलांनी शिक्षणाकडे पाठ फिरविली असेल किंवा स्पर्धा मध्ये टिकत असेल तर त्यांनी समाजातील हुशार आणि होतकरू मुलांसाठी मेडिकल किंवा आयआयटी प्रचंड वाढलेल्या फी मुळे प्रवेश अडत असेल तर अशा वेळी शैक्षणिक दाईत्व घेऊन कोंबडी प्रमाणे त्यांना आर्थिक ऊब देऊन त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलावा. हेच काम करण्यासाठी गरजू विद्यार्थी आणि आर्थ दाते यांना एकत्र आणून सांगड घालण्याचे काम सध्या
भाऊसाहेब माने शैक्षणिक उष्मायान संस्करण कक्ष या माध्यमातून सुरू आहे अशी त्यांनी माहिती दिली.