गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
गुरुकुल ज्ञानपीठ तेल्हारा येथील दहावी माध्यमिक परीक्षेला बसलेले सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले विशेष म्हणजे सलग आठव्या वर्षी १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे यामध्ये प्रथम क्रमांक कु. समृद्धी संदीप अवताडे ९९.२० टक्के द्वितीय क्रमांक कु.सृष्टी रामदास येऊतकार ९८.२० टक्के तर तृतीय क्रमांक कु.गायत्री रघुनाथ फोकमारे ९७.८०.टक्के हिने पटकाविला आहे माध्यमिक परीक्षेत मध्ये एकूण ३९ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी ३२ विद्यार्थी उच्च प्रविण्य श्रेणीमध्ये तर ७ विद्यार्थी प्रथम श्रेणी मध्ये पास झाले आहेत संस्थेचे अध्यक्ष श्री कमल मदनलालजी माहेश्वरी व सौ. अर्चना कमल माहेश्वरी तसेच मुख्याध्यापक किशोर सोपानराव देठे व सुशील शंकरराव देशमुख यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले तसेच शाळेतील शिक्षक निलेश डांगे सौ अर्चना पारस्कर सौ.मीनाक्षी देठे कु. अनुराधा अवचार कु.पूजा तापडिया कु.विनल अवचार चंद्रशेखर दातकर.रामेश्वर डोसे विकास जोशी .संतोष खोटरे सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी गुणवंत गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले











