गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा प्रतिनिधि वाडीअदमपुर ते ईसापुर ला जोडला जाणारा नागझरी नदीवरील रपटा खचल्याने ईसापुर गावचा संपर्क तुटला असुन संमधीत विभागाने याकडे लक्ष देवुन रपटा दुरुस्त करण्याची मागणी होत आहे या रपट्यावरुन जाणे येणे करणे कठीन झाले असुन नागरीकांना व विद्यार्थ्यांना तसेच वृद्ध व्यक्तींना या रपट्यावरुन जाणे येणे करणे खुप कठीन झाले असुन या रपट्यावरुन वाडी आणी ईसापुर येथिल
येथिल शेतकऱ्यांना आपल्या मालाची तसेच जिवनाआवश्यक वस्तुच्या मालाची ने आन करण्यासाठी हा एकच रस्ता आहे त्यामुळे हा रपटा लवकर दुरुस्त करण्यात यावा मागील दोन तिन वर्षापुर्वी पासुन रपटा खचला असुन या वर्षी आलेला पुरामुळे मोठा खड्डा पडला आहे याकडे संमधीत विभागाने लक्ष देवुन रपटा दुरुस्त करावा अशी मागणी होत आहे
हा रपटा दोन तिन वर्षा पुर्वीपासुन खचला आहे त्यामुळे रपटा दुरुस्तीचे काम पावसाळ्या पुर्वी करणे अपेक्षीत होते परंतु समंधीत विभाग यांचेकडुन रपटा दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले नाही यावर्षी,आलेल्या पुरामुळे रपटा जास्त खचल्यामुळे व त्यामध्ये मोठा खड्डा पडल्यामुळे नागरीकांना मोठा ञास होत आहे त्यामुळे समंधीत प्रशासनाने याची दखल घ्यावी
मिराताई आनंद बोदडे
सरपंच ग्रा.पं ईसापुर
नागझरी नदीवरील रपट्याच्या दुरुस्ती करीता निधी मिळावा या करीता जि.प.बांधकाम विभाग यांचेकडे मागणी केली परंतु कोरोनामुळे निधी उपलब्ध झाला नाही
धनंजय बरडे उपभियंता