पवनसिंग तोडावत
ग्रामीण प्रतिनिधी अंधानेर
कन्नड 18: अधांनेर परिसर येथे महिला बचत गटांना उद्योगासाठी पतपुरवठा करणारी संस्था म्हणजे आदर्श महिला स्वयंसाह्यता बचतगट पतसंस्थाचे उदघाटन झाले.यावेळी प्रमुख उपस्थित पतसंस्थाच्या अध्यक्ष सविता अधाने ,भाजपाचे मा. उपसभापती काकासाहेब तायडे ,अधांनेरचे सरपंच अशोक दाबके ,साहेबराव गवळी ,मा.सरपंच काकासाहेब कवडे ,ग्रामसेवक पगारे ,जिल्हा बँकचे राऊत नाना,पतसंस्थाचे मार्गदर्शक देविदास अधाने ,मुडंवाडीचे सरपंच गोविंद सोनवणे ,ग्रामपंचायत सदस्य गोपाल राजपुत ,भाजपाचे संदिप काळे ,विविध मान्यवर उदघाटन प्रसंगी उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमाचे संयोजन प्रा.आर.जी.लाहाणेसर यांनी केले.यावेळी पतसंस्थाचे पदाधिकारी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी कर्मचारी मेहनत घेतली.