स्थानीक युवकांचा शिवसेना पक्ष मध्ये शिवबंधन बांधून प्रवेश
राजअनिल पोचमपल्लीवार
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
मूलचेरा :- शिवसेना पक्षाचे राज्यव्यापी शिवसंपर्क अभियान 12 जुलै पासून प्रारंभ झाले असून शुक्रवार 18 जुलै रोजी मुलचेरा येथील शिवसेना जनसंपर्क कार्यालय मुलचेरा येथे शिवसंपर्क अभियाना अंतर्गत बैठक घेऊन प्रभाग निहाय सविस्तर चर्चा करण्यात आले. यात स्थानिक युवकांनी शिवबंधन बांधून पक्ष प्रवेश केला.
शिवसेनेचे पक्ष प्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या सूचनेनुसार अहेरी विधानसभा अंतर्गत शिवसेना संपर्क अभियानाची सुरुवात करण्यात आली. मुलचेरा येथील शिवसेना कार्यकर्त्याच्या आढावा बैठक घेतले. यावेळी जिल्हा प्रमुख रियाज शेख यांनी शहरातील प्रभाग निहाय आढावा घेऊन विकास कामांसाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व राज्याचे नगरविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.एकनाथराव शिंदे सदैव प्रयत्नशील व कटिबद्ध असून शहराच्या विकासासाठी शिवसेनेचे संघटन वाढवून पक्षाचे ध्येय-धोरणे, पक्षाचे आचार-विचार प्रत्येक घराघरात पोहचवा असे आवाहन करून, कोरोना मुक्तीसाठी कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करा असेही मोलाचे मार्गदर्शन यावेळी शिवसैनिकांना केले. तसेच मुलचेरा नगरात एकूण 17 प्रभाग असून प्रभाग व बुथनिहाय प्रमुखांची नियुक्ती करून व युवा सेनेचे कार्यकारिणी गठीत करण्यात आले असून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी ‘गाव तिथे शाखा व घर तिथे शिवसैनिक’ उपक्रम राबवून शिवसंपर्क अभियान युद्धपातळीवर राबविण्याचे सूचना करण्यात आले. मुलचेरा आणि गणेशनगर येथील अनेक युवकांनी जिल्हा प्रमुख यांच्याकडून शिवबंधन बाधून शिवसेना पक्ष मध्ये प्रवेश केले. यावेळी अहेरी उपजिल्हा प्रमुख अरून धुर्वे, पौर्णिमा इष्टम शिवसेना महिला आघाडी उपजिल्हा संघटीका अहेरी, शिवसेनेचे तालुका प्रमुख गौरव बाला, ग्रामीण तालुका प्रमुख काशीनाथ कन्नाके .बंगाली आघाडी जिल्हाप्रमुख दिपक बिस्वास, युवासेना तालुका प्रमुख राजेश गुंतीवार, संजय गांधी निराधार योजना चे तालुका अध्यक्ष संजय मंडल, मुकेश ठाकुर उप तालुका प्रमुख मुलचेरा, उत्तम बिस्वास, सुकुमार गायली, सतीश कर्माकर दास, सुरजित कर्मकार, सतीश कर्मकार, सचिन आरके, अमित अधिकारी, राजू मंडल, सुकांत बाईन, राहुल सरकार, निताई कर्मकर, संदीप रॉय, संजीव घरामी, राजू मंडल, व अन्य प्रभाग निहाय शिवसैनिक उपस्थित होते.