सुनिल गेडाम तालुका प्रतिनिधी,सिंदेवाही
सिंदेवाही: सिंदेवाहि-लोनवाहि चे नगराध्यक्ष “श्री स्वप्नील कावळे यांनी सेवाभावीनिर्णय घेत दिनांक 20 जून 2023 रोजी पासून “दिन विशेष” औचित्य साधत नगरपंचायत सिंदेवाहि- लोणवाही नगर पंचायत क्षेत्रामधील नागरिकासाठी सामाजिक दायित्वाच्या जानिवेतुंन सेवाभावी कार्याचा निर्णय घेत नागरिकासाठी स्वर्गरथ हा निशुल्क देण्यात येईल,याबाबत तश्या सूचना
नगरपंचायत सिंदेवाहि-लोनवाही च्या “आरोग्य” विभागास दिल्या आहेत,”सिंदेवाहि-लोनवाही-अंबोली”या नगरपंचायत च्या कोणत्याही कुटुंबात दुःखद
घटना घडेल, दुःखद प्रसंग ओढावेल शहरातील त्या-त्या प्रभागातील कुटुंबास “स्वर्गरथ” ही सेवा मोफत देण्यात येईल, कारण स्वर्ग रथासाठी 700 रु दर लागत असतो त्यामुळे सहसा कुणीही “स्वर्गरथाचा आग्रह धरत नव्हते , सर्व सामान्य नागरिक घरी स्वर्गरथ आणू शकत नव्हता, या पुढे नगर पंचायत मधील कोणत्याही नागरिकाच्या घरी दुःखद प्रसंग ओढवला तर स्वर्गरथा साठी लागू असलेला 700/- (अक्षरी :- सातशे रुपए ) हा संपूर्ण शुल्क स्वप्नील कावळे हे स्वतः “नगराध्यक्ष” या पदावर कायर्रत आहेत तिथपर्यंत स्वतः अदा करतील.! तेव्हा यापुढे समाजातील ज्या कुनाही कुटुंबावर दुःखद प्रसंग ओढावेल त्या-त्या कुटुंबावर नगरपंचायत द्वारे आकारण्यात येणारे स्वर्गरथाचे” शुल्क रु, 700/- (सातशे रूपये) आकारण्यात येवू नये, सदर “पुन्यस्वरूप” कार्यात सहकार्य करुण सामाजिक दायित्वाच्या जानिवेतुंन “उपरोक्त कार्य करण्याचे पूण्य लाभावे या भावनेतून पुन्यस्वरूप निर्णय घेत असल्याचे सांगितले आहे त्यांच्या या निर्णयाचे सर्व-सामान्य स्तरावर सर्वत्र कौतुक होत असून या प्रसंगी नगरपंचायत सिंदेवाहि-लोनवाही च्या सर्व सदस्यानी सुद्धा त्यांच्या या निर्णयाचे स्वागत करीत सेवाभावी उपक्रम राबविन्यास आम्ही सुद्धा सदैव “तुमच्या भूमिकेशी सहमत असून सदर सेवाभावी कार्यात आम्ही सुद्धा सहकार्य करू अश्या भावना व्यक्त केल्या आहेत.


