रितेश टीलावत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा =आ.रोहित पवार यांचे कर्जत जामखेड मतदारसंघात आयोजित अखिल भारतीय सुजन भजन स्पर्धेत वारी भैरव गडचे ज्ञानेश्वर महाराज वाघ यांना सन्मानित करण्यात आले.सृजन भजन महास्पर्धा आ. रोहित पवार आपल्या मतदारसंघात दरवर्षी आयोजित करीतअसतात. यावेळी गरजेचे अखिल भारतीय स्तरावर आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचा सांगता समारंभ शनिवारी शारदा बाई पवार सभागृह कर्जत येथे आयोजित करण्यात आला होता. सोहळ्या करिता आमदार रोहित पवार यांनी वारी भैरवगड चे वीर वैष्णव ज्ञानेश्वर महाराज वाघ यांचा सन्मान करण्याकरिता आमंत्रित केले होते. आज पार पडलेल्या या सोहळ्या त ज्ञानेश्वर महाराज वाघ यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. महाराजांचा हा सन्मान हा त्यांचे ज्ञानाचा त्यांच्या समर्पित जीवनकार्यचा आहे असे गौरवोद्गार यावेळी त्यांनी काढलेत.या सन्मानाने अकोल्याच्या वारकरी संप्रदायाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे अशी प्रतिक्रिया वारकरी मंडळाचे आर्किटेक अनंत गावंडे यांनी व्यक्त केली.या सोहळ्याला महाराष्ट्रातील तमाम संताचे विद्यमान वंशज आणि संस्थानिक उपस्थित होते.त्यात प्रामुख्याने विठ्ठल रखुमाई संस्थानचे विश्वस्त श्री माऊली महाराज खान्देश कर , माऊलींचे वंशपरंपरा गत चोपदार श्री राजाभाऊ
मुक्काई संस्थानचे अध्यक्ष भैय्यासाहेब पाटील, रविंद्र महाराज हरणे,देहू संस्थान चे अध्यक्ष श्री मानिक महाराज मोरे आदी वारकरी संप्रदायातील मान्यवर उपस्थित होते.


