अरविंद बेंडगा
तालुका प्रतिनिधी, तलासरी
तलासरी :- दि. 20 ऑगस्ट 2023 पालघर जिल्हा हा आदिवासी जिल्हा असून या जिल्यातील डहाणू प्रकल्पा अंतर्ग येणाऱ्या तलासरी तालुक्यातील उधवा येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू शासकीय माध्यमिक आश्रम शाळा उधवा ( कासपाडा ) ता. तलासरी जि. पालघर या शाळेला शाळेभावती कंपाऊंड नसल्या कारणामुळे शाळेची खूप दुरावस्था झालेली आहे, तसेच तेथील मुलांच्या संडास बाथरूला दरवाजे सुद्धा नाही व त्यांच्यावर पत्रे ही नाही, इमारत जरी असली तरी पूर्ण इमारतला पाणी गळते अशी अवथा शाळेची झालेली दिसून येते तसेच तेथील मुख्याध्यापक मनोहर जप्ताप यांचं शाळेच्या दुरावस्थेवर काही ही लक्ष नाही.आम्ही गावातील ग्रामस्थ म्हणून या शाळेला भेट दिली तेव्हा आम्हाला या शाळेची अशी दुरावस्था झालेली आहे. रंजित दादोडा, सुरेश नम, वसंत दलवी, संतोष सातवी संदीप थोरात, अनिल गवळी, प्रकाश माहला, पिंटू दलवी.


