प्रकाश नाईक,
तालुका प्रतिनिधी अक्कलकुवा
अक्कलकुवा :- दि. 20 ऑगस्ट सामाजिक प्रत्येक घटकांचा न्याय हक्कासाठी संघर्ष करणारे पत्रकार महासंघ, वैश्विक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित महाराष्ट्र, नो. क्र.39/2023 या भारत सरकार मान्यता नोंदणीकृत महासंघ मधे संजय पराडके यांची धडगाव तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. संजय पराडके हे अतिशय हुशार आणि समाजसेवेसाठी नेहमीच तत्पर असणारे व्यक्ती आहेत.
संजय पराडके हे tribal मंच live News या पोर्टल चे संपादक तथा सायं दैनिक ज्योतिर्गमय या वृतपत्रात नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहॆ. तसेच सामाजिक कार्यकर्ता म्हणुन ट्रायबल फोरम संघटनेचे धडगाव तालुका अध्यक्ष म्हणून देखील कार्यरत आहॆत.
संजय पराडके यांची नियुक्ती ही वैश्विक पत्रकार महासंघाचे संस्थापक मुजम्मिल ए. हुसेन, राष्ट्रीय अध्यक्ष सईद एन. कुरेशी, महासचिव प्रफुल बी. सूर्यवंशी यांच्या मान्यतेने करण्यात आलेली आहेत.