महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधी भद्रावती
भद्रावती, दि.१७:-चंद्रपूर जिल्हा युवा सेनेचा शिव संपर्क अभियानाच्या अंतर्गत गाव तेथे युवासेना हे ब्रिंद लक्षात घेऊन भद्रावती तालुक्यातील माजरी येथे युवा सेनेची बैठक घेण्यात आली.युवा सेनेचे सचिव वरून सरदेसाई, युवासेना कार्यकारणी सदस्य रुपेश दादा कदम व चंद्रपूर जिल्हा विस्तारक नित्यानंद त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनानुसार बैठकीचे आयोजन करण्यात आले.सदर बैठकीत मान्यवरांनी उपस्थित युवासेनेच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून प्रत्येक गावात युवासेना बळकट करण्याचे आवाहन केले. सदर बैठकीला माजरी ग्राम पंचायत सदस्य तथा युवासेना तालुका सरचिटणीस सरताज सिद्दीकी, तालुका प्रमुख महेश जीवतोडे, शहर युवा सेना प्रमुख तिरुपती, आलेख रट्टे व अनेक युवा सेनेचे कार्यकर्ते तथा पदाधिकारी उपस्थित होते. सदर बैठक युवसेनेचे जिल्हा प्रमुख हर्षल शिंदे यांच्या नेतृत्वात घेण्यात आली.


