गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा:-तेल्हारा येथे विश्व हिंदू परिषद व समस्त वारकरी संप्रदायाचे संयुक्त निवेदन तहसीलदारांना देण्यात आले राज्य सरकार आषाढी वारी पंढरपूर विरोध म्हणजे सरकारने आस्मानी संकटाचा फायदा घेत पोलिस प्रशासनाच्या बळाने वारकरी संप्रदायावर जाणीवपूर्वक केलेले सुलतानी अत्याचार आहेत महाराष्ट्राचे ज्येष्ठ कीर्तनकार आदरणीय ह.भ.प .बंडातात्या कराडकर यांना केलेली अटक त्यानंतर फसवणूक केली त्यांची नजर कैद हा त्यांचाच एक प्रकार आहे भर रस्त्यावर वारकऱ्यांची पारंपारिक गणवेश उतरण्यात लावले राज्य सरकारने वारकऱ्यांच्या मागण्या निश्चित निर्णय न घेतल्यास त्या काळात राष्ट्रव्यापी तिव्र व आंदोलनाचा इशारा या आधी आम्ही राज्यात विविध ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन दिलेला आहे या आंदोलनाला इतर साधु.संताची वारकऱ्यांची होणारी अवहेलना न थांबल्यास महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्येच्या 60 टक्के इतका असलेला वारकरी मतदार समाज संपूर्ण महाराष्ट्रात पंढरपूर पॅटर्न राबवण्यासाठी येणाऱ्या काळात रस्त्यावर उतरेल याची कृपया गांभीर्याने यांनी नोंद घ्यावी या वेळी निलेश खेट्टे बजरंग दल तेल्हारा संयोजक
विशाल गावत्रे बजरंग दल तेल्हारा ता. सहसंयोजक .ह.भ.प. पवन हिंगणकार अखिल भारतीय वारकरी मंडळ केंद्रीय सदस्य
अजय बाभुळकर. अरुण मानकर रघुनाथ लाघे प्रेमचंद्र बायड . ज्ञानेश्वर मार्के .प्रदीप राजुस्कर
अर्जुन वाघ बजरंग दल तेल्हारा ता. संयोजक. आकाश पिवाल बजरंग दल तेल्हारा सहसंयोजक महेश सिसोदिया .राहूल श्रृंगारकर सर. गोकुळ हिंगणकार .नागोराव भारसाकळे .गजानन गायकवाड रवींद्र गावंडे . संदिप इंगळे .गोपाल वाघ. संतोष आगरकर .अक्षय मोरे .हिंदूप्रेमी.व वारकरी उपस्थित होते


