राजेंद्र पोटफोडे
ग्रामीण प्रतिनिधी,अमरापुर
अमरापूर:शेवगाव तालुक्यातील अमरापूर येथील श्री रेणुका माता मंदिरातील मूर्तीचा लाखो रुपयाचे सोने चांदीचा साज चोरीला गेल्याची घटना घडली असून चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.अमरापुर येथे शेवगाव- नगर राज्य मार्गालगत असणाऱ्या श्री क्षेत्र रेणुका माता मंदिराच्या गाभाऱ्यातून मूर्तीला साज असलेल्या सोन्या-चांदीचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शुक्रवार सकाळी उघडकीस आली.घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील पाटील पर्यविक्षाधीन सह पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीस निरीक्षक दिलीप आहेर यांच्यासह पोलीस पथक आणि ठसे तज्ञ घटनास्थळी दाखल झाले आहेत. मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेराची चित्रफीत तपासली असता यात दोन चोरटे कैद झाल्याचे दिसून आले. मंदिराच्या बाहेरील ग्रीलचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला नंतर गाभाऱ्याच्या दरवाज्याची कुलूप तोडले व मूर्तीच्या अंगावरील सोने-चांदीचे दागिने व इतर वस्तू चोरून नेले आहेत विशेष म्हणजे येथे पाच रक्षक रात्रीच्या गस्तीस होते. त्यांनाही याची माहिती झाली नाही, शुक्रवारी सकाळी पुजारी मंदिरात जातात त्यांना घटना निदर्शनास आली हा प्रकार शुक्रवारी पहाटे झाला असून पोलिसांनी आरोपीच्या अटकेसाठी तपसचक्र फिरवली आहेत.