याहीवर्षी शंभर टक्के निकाल
विद्यालयाच्या आदिती सुनील राखोंडे ला मिळालेले शंभर पैकी शंभर टक्के गुण
किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षा प्रत्यक्ष लेखी स्वरूपात होऊ शकल्या नसल्या तरी अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला निकाल शासनाने शुक्रवार दिनांक 16 जुलै रोजी दुपारी जाहीर केला असून पातुर तालुक्याचा शंभर टक्के निकाल लागला आहे. अमरावती विभागाचा निकाल 99.98 टक्के लागला असून पातुर तालुक्यातील सावित्रीबाई फुले विद्यालयाचा निकाल याहीवर्षी यशाची परंपरा कायम राखत शंभर टक्के लागला आहे. विशेष म्हणजे या वर्षी सावित्रीबाई फुले विद्यालयाची विद्यार्थिनी कु. आदिती सुनील राखोंडे हिने 100 पैकी 100 टक्के गुण मिळवून विभागात आपले नाव प्रथम क्रमांकाच्या यादीत नोंदवून यशोशिखर गाठले आहे. कु. मैथिली रमेश इंगळे हिने 97.60% मिळवून दितीय क्रमांक पटकावला तर कु.साक्षी दिलीप इंगळे हिने 96.60 % गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे विद्यालयातील परीक्षेला बसलेल्या सर्वच विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयातील प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन संस्थेच्या व शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला या वेळी पालकांनी समाधान व्यक्त करत विद्यार्थी हे शाळेच्या व शिक्षकांच्या मेहनतीने प्रगतीच्या वाटेवर आहेत अशा प्रतिक्रिया देत विद्यालय हे असेच नावारुपाला ईद राहो अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या. विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या यशाचे श्रेय आपले आई-वडील व गुरुजन वर्ग यांना दिले.