सतिश मवाळ
ग्रामीण प्रतीनीधी मेहकर
मेहकर तालुक्यातील उकळी येथिल शेतकरी जयराम विश्वनाथ सावंत यांच्या शेतामधुन दि 2 फेब्रुवारी रोजी अज्ञात व्यक्तीने 18स्पिकलर तोट्या चोरून नेल्या आहेत.
गावातील कोणत्याही व्यक्ती सोबत वाद तंटा न करता सर्व सोबत प्रेमाने राहुन मेहनत करून शेति करत आहे.जन्मताहा अपंग असुन मेहनतीने शेती करत असून त्यांच्या सोबत विकृतीचा कळस गाठणारी घटना शेतकऱ्याच्या शेतातील 30 पपईची झाडे कुणीतरी विकृताने तोडून टाकली. काल, 16 जुलैला सकाळी ही बाब समोर आल्यानंतर शेतकरी हवालदील झाला आहे. या प्रकरणी मेहकर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली असून, जयराम विश्वनाथ सावंत (39, रा. उकळी) हे सेलू (जि. परभणी) येथे लग्नासाठी गेले होते. त्यांचे वडील विश्वनाथ सखाराम सावंत शेतात म्हशीला पाणी पाजण्यासाठी सकाळी सव्वा अकराला गेले असता त्यांना शेतात लावलेली पपईची झाडे तोडून टाकलेली दिसली. त्यांनी मुलाला ही माहिती दिली. त्यामुळे जयराम सावंत तातडीने घरी परतले. शेतात पाहणी केली असता दहा गुंठ्यांत लावलेली पपईची 30 झाडे कुणीतरी तोडलेली आढळली. ही झाडे फळांनी लगडलेली होती. यात सावंत यांचे 25ते 30 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. पोलिसांनी माथेफिरूविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास पोहेकाँ रामेश्वर कोरडे करत आहेत . संबंधित तलाठी अजय शेवाळे व कॄषी साह्यक सचिन देशमुख यांनी गट नंबर 364 मध्ये 0.20आर दि15/7/2021अज्ञान इसमाने पपईची तिस झाडें कापून टाकल्याची माहिती मिळताच .दि17/7/2021 कॄषी साह्यक व तलाठी यांनी पाहणी केली.तसेच पोलिसांनी
लवकरात लवकर आरोपी ला शोधण्यासाठी मागणी ग्रामस्थ करत आहेत.