प्रा.सुरेश नारायणे
तालुका प्रतिनिधी, नांदगाव
नांदगाव : नांदगाव जिल्हा नाशिक येथील आदर्श प्राथमिक शाळा येथे फेब्रुवारी 2023 मध्ये घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय मंथन प्रज्ञाशोध परीक्षा मधे नांदगाव मधील विविध शाळेतील 17 विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले, त्यांचा कौतुक सोहळा ट्रॉफी , प्रमाणपत्र देऊन साजरा करण्यात आला. या प्रसंगी आदर्श प्राथमिक शाळा नांदगाव चे मुख्याध्यापक श्री तांदळे सर तसेच कमलाबाई कासलीवाल शाळेचे मुख्याध्यापक श्री. सावंत सर छाजेड विद्यामंदिर चे श्री. प्रसाद बुरुकुल सर माध्यमिक विद्यामंदिर वेहेळगाव येथील श्री. अनिल नागरे सर तसेच जिल्हा परिषद शाळा ठाकरवाडी येथील मुख्याध्यापक श्री. सतीश बिरारी सर , आदर्श कोचिंग क्लासेस च्या संचालिका श्रीमती तवले मॅडम व परीक्षा केंद्राचे संचालक श्री. पंकज सोनवणे सर व उपस्थित होते. यावेळी आदर्श प्राथमिक शाळा नांदगाव येथील विद्यार्थी राज अरुणकुमार जाधव , राजवीर वीरेंद्र तवले , छाजेड विद्यामंदिर येथील रुद्रांश सचिन जाधव , स्वराज चेतन निकम, वेदश्री प्रसाद बूरुकुल, रिशिता शैलेश टिळेकर, व्ही जे हायस्कूल येथील देवांश चंद्रशेखर चव्हाण, श्रुती बिभीषण मोरे , जिल्हा परिषद शाळा महाजन वाडा येथील अद्विक विशाल सावंत , जिल्हा परिषद शाळा नायडोंगरी येथील कृष्णा कैलास बोरसे, लिट्ल स्टार इंग्लिश मिडीयम स्कूल येथील स्वरा सतीश बिरारी, जे टी के इंग्लिश मिडीयम स्कूल येथील आर्या ललित पगार , समृध्दी प्रवीण सौंदाने,माध्यमिक विद्यामंदिर वेहेळगाव येथील यज्ञेश अनिल नागरे , न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव येथील आरुषी गणेश बोरसे व वर्धमान हायस्कूल मालेगाव येथील यश समाधान पवार या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. कार्यक्रमासाठी आदर्श प्राथमिक शाळा चे शिक्षक श्री जाधव सर , चव्हाण सर , सुभाष पवार व सर्व शिक्षक वृंद यांनी सहकार्य केले. श्री. जाधव सर यांनी आभार मानले.