महेश बरगे ग्रामीण प्रतिनिधी अंबड
अंबड दि.18 अंबड तालुक्यातील लोणार भायगाव येथील शुभम राधाकिसन कुंडकर यांने इयत्ता दहावी मध्ये 82.40 टक्के गुण मिळविले आहे. शुभम ची आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे. त्यांची संपुर्ण देखभाल हि आईच करते. तो मत्स्योदरी विद्यालय लोणार भायगाव या शाळेत शिकत होता. या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक , शिक्षक वर्ग , तुळसाबाई राधाकिसन कुंडकर (आई-वडील) , शुभांगी कुंडकर (बहिण) तसेच जामखेड पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास जाधव (मामा) आदींनी शुभम चे कौतुक व अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.


