पवनसिंग तोडावत
ग्रामीण प्रतिनिधी अंधानेर
कन्नड दि.17: भरधाव आयशारने समोरून येणाऱ्या दुचाकीला चिरडले या भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला.धुळे सोलापूर महामार्गावर अंधानेर फाट्याजवळील कन्नड बायपास रोड क्रॉसिंग वर शनिवारी दुपारी दोन च्या सुमारास हा अपघात झाला तिघेही मृत मध्य प्रदेशातील शेधवा जिल्हातील असून मुकेश केकडिया निगवाल (28) भूवनसिंग छमकार निगवाल (30) सुनील पुण्या असकले (27) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. आयशर एम एच 20 ई ल 3644 चाळीसगाव कडून कन्नड कडे येत होता तर दुचाकीस्वार एमएच 20 बीएस 3993 कन्नड शहरातून चाळीसगाव कडे जात होता अंधानेर फाटयाजवळ कन्नड बायपास क्रॉसिंग जवळ दुचाकी व समोरून येणाऱ्या आयशायरची समोरासमोर जोरदार धडक झाली.यात आयशर पलटी होऊन उलट दिशेने वळला. तर दुचाकी वरील तिघेही धडकेत दूरवर फेकल्या गेले. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिघे दुचाकीस्वार वैजापूर तालुक्यात मजुरी करत होते. व गावाकडे परत जाताना सदर अपघात झाल्याचे समजते. कन्नड ग्रामीण रुग्णालयात तिघांची उत्तरनीय तपासणी करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच महामार्ग सहाय्यक पोलिस निरीक्षण(वाहतूक) कल्पना राठोड सहाय्यक फौजदार (वाहतूक) जाफर सय्यद यांच्या सह नंदकुमार नरोटे,गौतम थोरात,श्रीकांत चळेकर,शांताराम सोनवणे,शरद दळवी यांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहने रस्त्यावरून हटवली व वाहतूक सुरळीत केली. या घटनेचा पुढील तपास कन्नड शहर पोलीस करत आहे.


