प्रा.सुरेश नारायणे
तालुका प्रतिनिधी, नांदगाव
नांदगाव : व्ही.जे.हायस्कूल येथे भारताचा स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्सहात संपन्न झाला.शाळेचे मुख्याध्यापक मनोहर बडगुजर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात करण्यात आला.प्रसंगी पा.शि.संघ उपाध्यक्ष डॉ.गणेश चव्हाण, उपमुख्याध्यापक दिपक बाकळे,पर्यवेक्षक मनोहर शिंदे,माजी शिक्षक शाम सोनस भास्कर मधे,गुलाब मोरे .उपस्थित होते यांनतर मान्यवरांच्या उपस्थित भारतमाता पूजन करण्यात आले.मुख्याध्यापक मनोहर बडगुजर यांनी संदेश दिला या संदेशात पर्यावरण जनजागृती करून पर्यावरणाची जोपासना करणे , स्वच्छता संदर्भात जनजागृती करणे या गोष्टीचा विद्यार्थांनी अंगीकार केल्या पाहिजे व मोबाईलचा गरजेपुरता वापर करण्याचे सांगितले. त्यानंतर मुख्याध्यापकांनी एन.सी.सी. पथकाचे निरीक्षण करण्यात आले. एन.सी.सी. शिक्षक राजेश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली एन.सी.सी. च्या विद्यार्थांनी सुंदर असे संचलन केले व ध्वजाला मानवंदना दिली . या संचलनात विद्यार्थिनीचा यात सहभाग होता.हे संचलन पाहण्यासाठी नांदगाव मधील मोठ्या सांगणे नागरिक,आजी माजी विद्यार्थी शिक्षक पालक उपस्थित होते. त्यानंतर ज्ञानयात्री अंकाचे प्रकाशन करण्यात आले या अंकाची माहिती प्रविण अहिरे यांनी दिली.राज्य गीताचे समुहगायन करण्यात आले.व देशभक्तीपर गीत सादर केले.या गीताना राजेश भामरे , प्रियंका पाटील,निवेदिता सांगळे,सुनिता देवरे यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रियंका पाटील यांनी केले आभार अनिल तांबेकर यांनी मानले.या कार्यक्रमाचे नियोजन शाळेतील क्रीडा शिक्षक खंडू चौधरी,सुनिता देवरे,राजेश भामरे,सांस्कृतिक प्रमुख प्रियंका पाटील यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.