भारत भालेराव
ग्रामीण प्रतिनिधी, शेवगाव
शेवगाव:अनेक थोर महापुरुष स्वातंत्र सेनानी आणि सैनिकांच्या कष्टातून,त्यागातून , बलिदानातून १५ ऑगस्ट १९४७ रोजी हे स्वातंत्र्य आपल्याला मिळाले आहे आणि ते आपण प्राणपणाने जपले पाहिजे आणि आज भारत देश विविध क्षेत्रात प्रगती करत आहे हे ओळखून सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यास करून आपल्या देशासाठी समर्पण भावनेनं काही तरी करून आपल्या शाळेचे आणि गावचे नाव उंचीवर घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करावेत असे प्रतिपादन ढोरजळगाव शे चे ग्रा.पं सदस्य देविदास गिर्हे यांनी ढोरजळगाव येथील श्रीराम माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय ढोरजळगाव येथे 77 व्या स्वातंत्र्य दिनी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना केले.श्रीराम विद्यालयात स्वतंत्र भारताचा 77 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला ढोरजळगाव शे च्या प्रथम नागरिक सौ.रागिणीताई लांडे व प्रमुख अतिथी देविदास गिर्हे यांच्या शुभहस्ते ध्वजपूजन व ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला.विद्यालयातील विद्यार्थ्यांनी एक सूर एक तालाचे प्रदर्शन करत सामुदायिक कवायत व मानवी मनोऱ्यांचे सादरीकरण केले.उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.विद्यालयाचे प्राचार्य संजय चेमटे यांनी आपल्या प्रास्ताविकात भारताची स्वातंत्र्य चळवळ आणि आज भारत देशासमोरील समस्या आणि नागरिक म्हणून आपले हक्क आणि कर्तव्ये याबाबत माहिती दिली.यावेळी मान्यवरांच्या शुभ हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.कार्यक्रमासाठी ढोरजळगाव गावच्या प्रथम नागरिक सौ.रागिणीताई लांडे,ग्रा.पं सदस्य देविदास गिर्हे,डॉ.सुधाकर लांडे,माजी सभापती देविदास पाटेकर,भिवसेनजी केदार,महेश्वरजी पाटेकर,संभाजी लांडे,वसंतराव गिर्हे मेजर, दुर्योधन गिर्हे मेजर ,अनिल नागरगोजे,दिगंबर साबळे,शेषेराव गिर्हे,डॉ नामदेवराव दौंड,बाळासाहेब पाटेकर,पत्रकार दीपक खोसे,पत्रकार ज्ञानेश्वर फसले,किरण लांडे,ग्रा.पं सदस्य रोहन साबळे,विकास नन्नवरे, सूर्यभान गाडगे,सोमनाथ वाकडे ,विजय पाटेकर,संभाजी फसले,राजूभाऊ गर्जे,दिगंबर साबळे, श्रीधर पाटेकर,कल्याण जायभाये यांचे सह विद्यालयाचे प्राचार्य संजय चेमटे,पर्यवेक्षक सुनील जायभाये तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्यने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्था प्रतिनिधी सुरेश तेलोरे यांनी केले तर सचिन कुलकर्णी यांनी आभार मानले.कार्यक्रमाच्या शेवटी मुलांना खाऊवाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.