राहुल घोबाळे
शहर प्रतिनिधी परळी वै.
परळी वै.:दि.१५ ऑगस्ट २०२३ परळी वैजनाथ तालुक्यातील कन्हेरवाडी गावातील सोमनाथ विद्यालयाच्या अपुऱ्या वर्गखोल्यामुळे 35 वर्षात शाळेतील 400 मुली माध्यमिक शिक्षणापासून वंचित तालुक्यातील कन्हेरवाडी गांवातील सोमनाथ माध्यमिक विद्यालय हे 1994 पासून सुरू या विद्यालयातला शालेय इमारत बांधकामासाठी 2001 मध्येच करोडो रुपयांचे वेतनेतर अनुदान प्राप्त झाले आहे पण संस्था चालकांनी शाळांची इमारत बांधकाम नाही करता गेली 35 वर्षे शाळा पत्र्याच्या शेडमध्ये, अपुऱ्या वर्गखोल्यात भरवत असून वर्गात आसन व्यवस्था नसल्यामुळे गेल्या 35 वर्षात 400 मुली माध्यमिक शिक्षणापासून वंचित राहिल्या आहेत यावर ना शालेय शिक्षण समिती चे लक्ष ना शिक्षण अधिकाऱ्यांचे त्यामुळे शाळेची सुज्ज इमारत उभी करावी आणि माध्यमिक शिक्षणापासून कोणी मुली वंचित राहू नये म्हणून अखिल भारतीय दिव्यांग हित कारणी सभेच्या उपाध्यक्ष सौ . मिरा रोडे कन्हेरवाडी गांवातील ग्रामविकास अधिकारी तथा सचिव शालेय शिक्षण समिती यांना निवेदन दिले आहे.
दरम्यान महाराष्ट्र सरकारने शाळेला भव्य इमारतीसाठी, खेळाचे मैदानासाठी, विज्ञानाची प्रयोगशाळा, मध्यान्ह भोजन खोली साठी, शौचालय बांधकामासाठी, पिण्याच्या पाण्यासाठी वेतनेतर अनुदान म्हणून करोडो रुपयांचे अनुदान 2001 मध्येच वाटप केले आहे पण संस्था चालकांनी हे अनुदान शाळेच्या इमारतीसाठी न वापरता इतरत्र वापर करून कन्हेरवाडी गांवातील 400 मुलींना माध्यमिक शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे काम केले आहे याकडे ना शालेय शिक्षण समिती चे लक्ष ना शिक्षण अधिकाऱ्यांचे त्यामुळे शाळेची सुज्ज इमारत उभी करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशा अशांचे लेखी निवेदन अखिल भारतीय दिव्यांग हित कारणी सभेच्या उपाध्यक्ष सौ.मिरा रोडे यांनी कन्हेरवाडी गांवातील ग्रामविकास अधिकारी तथा सचिव शालेय शिक्षण समिती यांच्या कडे सादर केले आहे असे एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.