मधुकर केदार
जिल्हा प्रतिनिधी अहमदनगर
बायोस्टॅड इंडिया लि.कंपनी या कंपनीचे शेती क्षेत्रातील उत्पादन वाढवण्यामध्ये गेली ३७ वर्षापासून भरीव योगदान आहे, या कंपनीचे अनेक उत्पादने(उदा. BIOZYME, ROKO, REJOICE) बाजारात उपलब्ध आहेत.या उत्पादनावर शेतकऱ्यांचा गेली 37 वर्षापासून विश्वास आहे. त्याचबरोबर सामाजिक बांधिलकीतून कंपनी दरवर्षी देशभरातील ग्रामीण भागातील अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करते, याचाच एक भाग म्हणून या वर्षी कंपनी मार्फत नेवासा तालुक्यातील महात्मा ज्योतिराव फुले माध्यमिक विद्यालय माळीचिंचोरा येथील इ. 10 वी च्या 14 विद्यार्थ्यांना प्रत्येकी रु.2500 प्रमाणे एकूण रु.35000 शिष्यवृत्तीचे वाटप केले. कार्यक्रमास उपस्थित माळीचिंचोरा येथिल बायोस्टड इंडिया लिमिटेड कंपनीचे अधिकृत डिलर गोपिनाथ भोजने (नाना) साहेब यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.यावेळी कंपनीचे श्री गोकुळ शिरसाट टेरिटरी मॅनेजर, श्री अन्वर सय्यद मार्केटिंग डेव्हलपमेंट आॅफिसर, श्री मनोहर कराड तालुका समन्वयक,श्री गणेश गाडेकर तालुका समन्वयक गावचे सरपंच राजेंद्र आहिरे , उपसरपंच दिलीप धानापुने, मा. जिल्हा परिषद सदस्य मिनाबाई दत्तात्रय शिंडे, चेअरमन तुकाराम पुंड, व्हा. चेअरमन बाळासाहेब शिंदे, मा. मुळा कारखाना डायरेक्टर एकनाथ धानापुने, मा. सैनिक मच्छीद्र धानापुने व विद्यालयचे मुख्याध्यापक श्रीमती विद्यादेवी सुरसे तसेच शिक्षक, शिक्षिका यांचे सह असंख्य ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी संस्था, विद्यालय व ग्रामस्थांचे वतीने बॉयस्टॅड इंडिया लि. कंपनीचे आभार मानण्यात आले.