योगेश रोकडे
शहर प्रतिनिधी, शेवगाव
शेवगाव – शेवगाव येथील मौलाना आझाद उर्दू प्राथमिक शाळेत भारताचा ७६ वा स्वातंत्र्य दिनाचा ध्वजारोहण शेवगावचे लोकप्रिय सामाजिक कार्यकर्ते फुलचंदआण्णा रोकडे यांच्या शुभहस्ते व युवा नेते अजिंक्यभैय्या लांडे,राष्ट्रवादी काँग्रेस शेवगाव कार्याध्यक्ष ताहेर पटेल,वंचित बहुजन तालुकाध्यक्ष प्यारेलालभाई शेख, मौलाना आझाद शैक्षणिक संस्थेचे सचिव जमीर पठाण,सदस्य मजहरभाई खान ,इम्रानभाई शेख,सामाजिक कार्यकर्ते तुफेलभाई मुलाणी,संतोष जाधव,अहमदभाई मणियार,अबरार जहागीरदार यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडला.यावेळी डॉ. उमेर खान, अशरफभाई शेख,आसिफभाई शेख,इम्रानभाई शेख,अक्रमभाई शेख,अबू जहागीरदार,इरफानभाई शेख,हुसेनभाई पठाण,प्रा.वैभव जगताप, फझलभाई काझी,अमीन सय्यद,महम्मद शेख,सौरभ अभंग,भिमसिंग पालवे,गणेश पालवे,इम्रान मणियार,बारीभाई शेख,आयुबभाई कुरेशी,कलीम शेख,आसिफ मणियार, जाहीदखान पठाण,महंमदआलम शेख,रामप्रसाद कोकरे,युनुसभाई शेख,मंजूर मणियार आदी उपस्थित होते.
सामाजिक कार्यकर्ते तुफेलभाई मुलाणी,इम्रानभाई शेख,अक्रमभाई शेख,हुसेनभाई शेख,फझलभाई काझी यांच्या तर्फे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांचे भाषणे व विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.कार्यक्रम यशस्वितेसाठी विद्यालयाच्या शिक्षिका हदिया बागवान मॅडम,सना शेख मॅडम, आस्मा पठाण मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आस्मा पठाण मॅडम यांनी केले तर उपस्थितांचे आभार संस्थेचे सचिव जमीर पठाण यांनी मानले.










