प्रकाश केदारे
तालुका प्रतिनिधी पाथरी
दि. 14 ऑगस्ट रोजी पाथरी येथील नामदेव नगर मधील अधिक मास सुरू झाल्यापासून विठ्ठल मंदिर येथे अधिक मास महात्मा चे कथन रोज रात्री ७-३० ते ९ वाजेपर्यंत रोज कथा नित्यनियमाने चालू होती या कथेचे वाचन प्रकाश बारहाते यांनी केले .कथेस नामदेव नगर निवासी सर्व माता भगिनी व पुरुष वर्गाची ही रोज हजेरी होती. अगदी खेळीमेळीच्या वातावरणात अधिक मास महात्मा कथा पार पडली या कथेच्या सांगते निमित्य.दि.१३-ऑगस्ट रोजी रात्री ९ ते १०-३० या वेळेत दुर्गादास महाराज ढोले मंगरूळकर यांचे कीर्तन झाले या कीर्तनास सर्व नामदेव नगरवासी यांनी खूप प्रतिसाद दिला सर्व नामदेव नगर वासी यांच्या वतीने महा अपंगतीचे आयोजन करण्यात आले . सर्व ग्रामस्थांनी आपापल्या परीने योगदान दिले व सर्व तरुण मंडळीचे व कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


