गणेश सवने
शहर प्रतिनिधी, सेलू
सेलू:- देशाच्या स्वातंत्र्याला ७६वर्षे पुर्ण होत असुन या सुवर्ण क्षणाचे औचित्य साधुन दि.१५ मंगळवार रोजी सकाळी ९.३०वा हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्य दिन पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदुस्थानातील असंख्य शुर वीरांच्या त्याग बलिदानाचा समर्पित भाव तरूण पिढी पर्यंत पोहचावा या हेतूने येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ने हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्य दिन पदयात्रा आयोजीत केली आहे. यात्रा बाबासाहेब मंदिर या ठिकाणाहून प्रारंभ होणार असून.
छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी सामूहिक गीत, पद्य श्लोकाने पदयात्रेचा समारोप होणार आहे. सेलू शहरातील सर्व नागरिक बंधु भगिनींनी आवर्जून उपस्थित राहवे. असे अवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.


