सुरेश हिरवे,
तालुका प्रतिनिधी, श्रीगोंदा
श्रीगोंदा ‘ग्रीन वर्ल्ड’ च्या वतीने प्रतिवर्षी देशभक्तांचा सन्मान म्हणून ग्रीन वर्ल्ड प्राइड ऑफ इंडिया हा पुरस्कार दिला जातो. स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षपूर्ती निमित्ताने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारामध्ये पांडुरंग दादा खामकर यांची निवड झाली आहे. खामकर यांनी उसाचे गुऱ्हाळ कांडप केंद्र. हॉटेल,आदी यशस्वी व्यवसाय केले. मल्टी लेवल मार्केटिंग सारख्या नवख्या क्षेत्रात पदार्पण करून त्यांनी त्यातही यश मिळवले. सिसपे मल्टीपर्पज अर्बन निधी लिमिटेड या कंपनीमध्ये ट्रेडिंग चे ज्ञान आत्मसात केले व त्या माध्यमातून चांगला नफा मिळवला. हे करत असताना स्वतःबरोबर त्यांनी इतरांनाही गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करून चांगला परतावा मिळवून दिला.
ते माऊली ग्रामविकास प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष आहेत.त्यानी दरम्यान कोरोना सारख्या आजाराने मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या नातेवाईकांना ‘माऊली ग्रामविकास प्रतिष्ठानच्या’ च्या माध्यमातून आधार देण्याचे काम केले. दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांनाही ते सहकार्य करीत असतात. तर गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य ही देतात सामाजिक बांधिलकी म्हणून ते आपले कर्म करत असतात एक प्रकारे ही देशसेवाच म्हणावी लागेल.खरे देशभक्तांचा सन्मान करणाऱ्या ‘ग्रीन वर्ल्ड’ ने त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना ग्रीन वर्ड ऑफ इंडिया हा पुरस्कार
जाहीर केला आहे.
राम बंधू मसाले चे अध्यक्ष हेमंत राठी. रावेतकर ग्रुपचे अध्यक्ष अमोल रावेतकर विक्रम इन्फ्राटेक डेव्हलपर्स चे सी.एम.डी. विक्रम गायकवाड ग्रीन वर्ल्ड चे अध्यक्ष गौतम कोतवा आदींच्या उपस्थितीत व ए वन ग्रुप यांच्या सहप्रायोजकतेने 14 ऑगस्ट रोजी पुणे येथे या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. खामकर यांना ग्रीन वर्ल्ड प्राइड ऑफ इंडिया हा पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचे ह.भ.प. धायरकर महाराज नवनाथ अवताडे. विनोद गाडीलकर, भाऊसाहेब जाधव, सुरज शिंदे, शिवाजी दुतारे, संदीप दरेकर, अशोक खेडकर, शिवाजी म्हस्के माऊली हिरवे, बापूसाहेब भुजबळ आदींसह सिसपे मल्टीपर्पज अर्बन निधी लिमिटेडचे सर्व संचालक व सिसपे परिवाराने अभिनंदन केले आहे.काल दि. १४/०८/२०२३ ला भारत स्वातंत्र्याच्या रौप्य महोत्सवा निमित्ताने ग्रीन वर्ल्ड 75 पुरस्कारार्थीना हा पुरस्कार प्रदान केला.









