भारत भालेराव
ग्रामीण प्रतिनिधी, शेवगाव
शेवगाव: दि 14 रोजी आबासाहेब काकडे विद्यालय शेवगाव येथे पंचायत समिती,शिक्षण विभाग शेवगाव येथील गटशिक्षणाधिकारी श्रीमती तृप्ती कोलते मॅडम यांनी भेट दिली असता आजादी का अमृत महोत्सव या अभियानातील स्वातंत्र्य दि 15 ऑगस्ट 2023 निमित्ताने फलक लेखनकार कलाशिक्षक शितलकुमार गोरे यांनी केलेले फलक लेखन पाहून त्या भारावून गेल्या व फलक लेखनाचे कौतुक केले अनोखे फलक लेखन असे उद्गार व्यक्त केले. समवेत विस्ताराधिकारी शैलजा राऊळ,विद्यालयाचे प्राचार्य संपतराव दसपुते,उपमुख्याध्यापिका सौ मंदाकिनी भालसिंग पर्यवेक्षक सुनील आव्हाड,पुष्पलता गरुड, केंद्रप्रमुख वसीम शेख,प्राचार्य संजय चेमटे,बबन ढाकणे,नितीन मिसाळ काकासाहेब गर्जे व अन्य मान्यवर उपस्थित होते.