भगवान कांबळे
तालुका प्रतिनिधी माहुर
माहुर-भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्या कडून संयुक्त राबविण्यात येत असलेल्या “मेरी मिट्टी मेरा देश ” मिट्टी को नमन विरो को वंदन “या आभियाना अंतर्गत दिनांक 14 ऑगस्ट २०२३ रोजी नगर पंचायत माहुर कार्यालयाच्या प्रांगणात माहुर शहराचे प्रथम नागरिक तथा नगराध्यक्ष फिरोज दोसाणी यांचे शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर लाड, मुख्याधिकारी डॉ राजकुमार राठोड, तसेच सन्माननीय नागरीक, सन्मानिय नगरसेवक, सन्मानिय नगरसेविका, यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण कार्यक्रम सकाळी ११:०० वाजता संपवून रॅलीव्दारे केंद्रीय प्राथमिक शाळा माहुर येथे जाऊन नगर पंचायत माहुर कडुन भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती दिलेल्या विरांना विनम्र आदरांजली अशा आशयाचे शिला फलक स्थापीत केले या शिला फलकाचे अनावरण नगराध्यक्ष फिरोज दोसाणी यांच्या हस्ते करण्यात आले.











