संजय भोसले
तालुका प्रतिनिधी , कणकवली
‘स्टुडिओ अर्थचे ‘ पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या हस्ते कणकवलीत येथे दिमाखात उद्घाटन करण्यात आले . यावेळी वास्तुविशारद गणेश महादेव म्हसकर , वास्तुविशारद प्रथमेश चंद्रकांत म्हसकर,म्हसकर कुटुंबिय , शहरातील नामांकित बिल्डर्स, पत्रकार, डाॕक्टर , अधिकारी , मित्र परिवार, हितचिंतक आदी मान्यवर उपस्थित होते. वास्तू विशारद गणेश व प्रथमेश म्हसकर यांच्या तहसिल कार्यालय येथील स्टुडिओ अर्थ व कार्यालयाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले .’स्टुडिओ अर्थ ‘ चे काम संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेले असून आपल्या नाविन्यपूर्ण संकल्पनेतून व कौशल्याने आजमितीस २५ प्रोजेक्ट उत्तमरीत्या पुर्ण केलेले आहेत. यामध्ये घरे , हाॕटेल्स , रिसॉर्ट, हॉस्पिटल, रेसिडेन्सअल बिल्डिंग , बंगलो , इंटीरियर डिझाईन अशा पुणे , नाशिक , मुंबई , गोवा, कोकण येथील प्रोजेक्ट ची नावे आवर्जून घ्यावी लागतील . कोकणातील नावाजलेल्या यंग आर्किटेक्ट मध्ये स्टुडिओ अर्थ चे नाव अग्रगण्य आहे. स्टुडिओ अर्थचे कार्यालय वास्तूशास्त्र आणि इंटेरियर चा एक उत्कृष्ट नमुना आहे. आनंददायी परिपूर्ण वास्तू निर्माण करणारे दालन म्हणजे ‘स्टुडिओ अर्थ ‘असे गौरोद्गार पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी काढले. याप्रसंगी बोलताना गणेश म्हसकर यांनी राबलेल्या नवनवीन प्रोजेक्ट विषयी माहिती दिली . तसेच स्टुडिओ अर्थ च्या माध्यमातून आपल्या स्वप्नातील घर , हॉटेल, रिसॉर्ट, हॉस्पिटल, रेसिडेन्सअल बिल्डिंग नवनवीन प्रोजेक्ट करण्यासाठी आपण सदैव तत्पर असल्याचे ते म्हणाले .


