दिपक मसुरकर
तालुका प्रतिनिधी, रिसोड
रिसोड : दिनांक 13/8/2023 रोजी डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला सलग्नीत सुविदे फाउंडेशन अंतर्गत कृषी महाविद्यालय रिसोड येथे . भारत देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या नविण्यतंम उपक्रम आणि मार्गदर्शिकाला अनुसरून विद्यार्थी कल्याण विभाग डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्या सूचनेला अनुसरून आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत “हर घर तिरंगा” अभियान कार्यरत असून दिनांक 13 ते 15 ऑगस्ट 2023 पर्यंत कृषि महाविद्यालय रिसोड अंतर्गत वाशिम जिल्ह्यात राबविण्यात येत असून सदर अभियान मध्ये हर घर तिरंगा उपक्रम राबविण्यात येत आहे. दिनांक 13 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय सेवा योजना युनिट कृषि महाविद्यालय रिसोड अंतर्गत ग्राम करडा ता. रिसोड येथे भव्य रॅली काढून घरोघरी , सार्वजनिक ठिकाणी जावून हर घर तिरंगा चे नारे देवून भारत मातेचा जयघोष करण्यात आला.सुविदे फाऊंडेशन कृषि महाविद्यालय रिसोड द्वारे आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत नाविन्यपुर्ण राष्ट्रभक्ती पर कार्यक्रम, प्रश्र्नमजुषा, वादविवाद स्पर्धा, सांस्कृतिक वारसा जोपासणारे नृत्य, नाटिका चित्रकला, रांगोळी देशाची अखंडता व सार्वभौम प्रशासन मध्ये एकटा अखंडित राहो या करिता वेग वेगळे राष्ट्रीय उस्तव साजरे होत आहेत. सदर हर घर तिरंगा मोहिमे करिता कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एम. अप्तुरकर , समन्वयक आर .एस. डवरे , डॉ.पि.जी.देव्हडे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी. प्रा.डी. डी. मसुडकर , प्रा. एल. बी. काळे, प्रा . कृष्णा देशमुख प्राध्यापिका जी . आर गोहाडे प्रा . इरफान शेख, प्रा सुनील जाधव, परिक्षा व शिक्षण विभाग कृषी महाविद्यालय रिसोड , राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक तथा इतर विद्यार्थी वर्ग समस्त कर्मचारी वृंद कृषि महाविद्यालय रिसोड यांच्या सहकार्याने हर घर तिरंगा अभियान रॅली यशस्वीपणे संपन्न झाली.