प्रकाश केदारे
तालुका प्रतिनिधी पाथरी
पाथरी येथे संस्कार कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात भारतीय जनता पार्टी पाथरी विधानसभा मंडळातील सोनपेठ, पाथरी ,मानवत मंडळाध्यक्षांच्या नवीन नियुक्तीसाठी मुलाखती संस्कार कनिष्ठ महाविद्यालय पाथरी या ठिकाणी भा.ज.पा. प्रदेश अध्यक्ष तथा परभणी जिल्हा प्रभारी आ. श्री गजानन जी घुगे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आल्या. या मुलाखतीसाठी तिन्ही तालुक्यातील भाजप प्रेमी आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी आपलीच अध्यक्षपदासाठी वर्णी कशी लागेल यासाठी आपली ताकद पनाला लावली. सोनपेठ मंडळातून २३ पाथरी मंडळातून ४५ मानवत मंडळातून ३१ परभणी ग्रामीण मंडळातून ३३ इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या. या मुलाखतीस जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे परभणी लोकसभा समन्वयक व पाथरी विधानसभा प्रमुख डॉ. सुभाष कदम, रबदाडे मामा पाथरी तालुकाध्यक्ष शिवराज नाईक, प्रदेश कार्यकारणी सदस्य इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)