सिध्दोधन घाटे
जिल्हा प्रतिनिधी बीड
बीड : दि. १० ऑगस्ट २०२३ फुले शाहू आंबेडकर विचारधारा तथा पुरोगामी महाराष्ट्रातील पुरोगामी आणि जेषठ विचारवंत संशोधक समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांच्या निधनाने पुरोगामी महाराष्ट्रातील पुरोगामी विचारात मोठी निर्माण झाली आहे. फुले शाहू आंबेडकर साहित्याचे आणि विचारधारेचे विचारवंत प्रचारक तथा समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील अनेक राज्यांत जाऊन फुले शाहू आंबेडकर यांची विचारधारा रोखठोकपणे मांडणारे विचारवंत म्हणून त्यांना देशभरात ओळखले जात होते. फुले शाहू आंबेडकर विचारधारा आणि संविधान प्रचारक प्रा.हरी नरके यांच्या निधनामुळे महाराष्ट्रतील आणि देशातील बहुजन समाजातील फुले शाहू आंबेडकर चळवळ पोरकी झाली असून त्यांनी त्यांच्या लिखाणातून आणि विचारातून निर्भिडपणे आणि प्रखरपणे मांडणारे जेष्ठ विचारवंत ज्यांनी फुले शाहू आंबेडकर चळवळ आणि भारतीय संविधान तळागळातील सर्व सामान्य माणसापर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न केले त्यांच्या निधनाने फुले शाहू आंबेडकर यांच्या विचार आणि पुरोगामी महाराष्ट्रातील पुरोगामी विचारांची चळवळ पोरकी झाली असून खुप मोठी पोकळी निर्माण झाली आहे.