संजय भोसले
तालुका प्रतिनिधी,कणकवली
प्रसिद्ध कथाकार जी. ए. कुलकर्णी यांच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने “शताब्दी संस्मरण अभिवाचन” कार्यक्रम शनिवार दिनांक 12 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी सहा ते आठ वाजता, तळेरे येथील वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालयाच्या डॉक्टर एम .डी .देसाई सांस्कृतिक भवन मध्ये आयोजित करण्यात आला आहे .प्रसिद्ध कथाकार जी .ए. कुलकर्णी यांच्या जन्मशताब्दी निमित्त प्रत्येक महिन्याला एक अभिवाचन कार्यक्रम सादर होणार असून, यामध्ये तीन कथा सादर करण्यात येणार आहेत. ऑगस्ट महिन्यातील हा अभिवाचन करण्याचा दुसरा कार्यक्रम आहे.आणि तो आयोजित करण्याचा बहुमान तळेरे येथील संवाद परिवाराला मिळाला आहे. जी .ए. कुलकर्णी यांच्या प्रत्येक महिन्याला तीन कथांचे अभिवचन वेगवेगळे तीन अभिवाचक करणार आहेत. यावेळी जिल्ह्यातील प्रसिद्ध सूत्रसंचालक व कलावंत निलेश पवार, देवी केळुसकर आणि कल्पना मलये. जी.ए .कुलकर्णी यांच्या कथांचे वाचन करणार आहेत. या साहित्य कार्यक्रमाला साहित्य रसिकांनी मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन संवाद परिवाराचे संस्थापक डॉक्टर कुलकर्णी यांनी केले आहे.


