सुरेश नारायणे
तालुका प्रतिनिधी, नांदगाव
नांदगाव : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राबविण्यात येणाऱ्या ‘मेरी माटी मेरा देश” या अभियानांतर्गत नांदगाव नगरपरिषदेच्या नेतृत्वाखाली शहरातील माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी शहरात तिरंगा प्रभात फेरी काढली. या रॅलीत एन.सी.सी. व्ही.जे. हायस्कूल, कमलाबाई माणिकचंद कासलीवाल,हायस्कूल, उर्दू हायस्कूल,व शहरातील सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. शहरातील हुतात्मा स्मारक येथे तिरंगा फेरी पोहचल्यावर भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या भारत मातेच्या वीर सुपुत्रांच्या स्मारक उभारण्यात आलेल्या ठिकाणी हुतात्मा स्मारक फलकाचे अनावरण मुख्याधिकारी विवेक धांडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी सैनिकांचा पारंपारिक पद्धतीने सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास नांदगाव नगरपरिषदेचे अधिकारी आनंद महिरे,राहुल कुठे,मुक्ता कांदे, रोशनी मोरे,विजया धनवट, भिजला गंगावणे, विजू कायस्थ,गणेश पाटील, संतोष ढोले, अरुण निकम, दिपक वाघ, आकाश जाधव, सुनिल पवार, रामकृष्ण चोपडे, निलेश देवकर, गौरव चुंबने, अंबादास सानप आदींसह नागरिक उपस्थित होते.