प्रकाश केदारे
तालुका प्रतिनिधी पाथरी
पाथरी येथील नेताजी सुभाष विद्यालयाच्या सण १९९३ च्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा एकत्र येऊन अनोखा स्नेह मिलन सोहळा घडवून आणला. शाळेचा शेवटचा टप्पा दहावी पास झाल्यानंतर दहा वर्षे एकत्र नांदणारी सवंगडी विखुरले जातात. कॉलेज, नोकरी, व्यवसाय, अशा अनेक मार्गाने विभक्त होतात. पण आपल्या बालपणापासून किशोर वयापर्यंतच्या गोड आठवणी प्रत्येकाच्या मनात शाबूत असतात. त्याचबरोबर एकमेकांना भेटण्याची आस ही मनात कायम असते. आणि या आवडीनेच त्या सर्वांना एकत्र आणले. सर्वांना एकत्र आणण्याचे काम शिवराज नाईक यांनी केले. शिवराज नाईक हे याच शाळेचे माजी विद्यार्थी होते. आणि आता नेताजी सुभाष विद्यालय याच शाळेत विज्ञानाचे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. तसेच संस्कार कनिष्ठ महाविद्यालय, पाथरीचे संस्थापक अध्यक्ष आहेत. शिवराज नाईक यांच्या मनात सारखी आपल्या शाळेतील मित्रांना एकदा एकत्र आणण्याची भावना सारखी सारखी येत होती. एक ते दोन दिवसापासून ते आपल्या स्थानिक च्या मित्रांच्या संपर्कात होते. इ. दहावीला एकूण सहा तुकड्या होत्या. जवळपास अडीचशे विद्यार्थी होते. पण एवढ्या सर्वांना संपर्क करणे खूप अवघड काम होते .पण जास्तीत जास्त मित्रापर्यंत पोहोचण्यासाठी पाथरीतील आपल्या अति जिवलग मित्रांच्या सहकार्याने प्रत्येक मित्र-मैत्रिणीपर्यंत पोचण्यासाठी संपर्क अभियान सुरू केले. या संपर्क अभियानासाठी शर्मिला कुलकर्णी, अर्चना चेहरे, महेश घटे, दीपक बिडकर, आणि शिवराज नाईक यांनी परस्परांशी चर्चा करून व्हाट्सअप ग्रुप तयार केला. हळूहळू मित्र जोडत गेले. जवळपास १०० हुन अधिक मित्रांचा ग्रुप तयार झाला. नंतर ३० जुलै ही तारीख ठरवण्यात आली. पण कार्यक्रमाला आर्थिक नियोजन हवे होते. त्यामुळे सर्वांनी समान योगदान देण्याचे ठरवले. भेटीच्या दिवशी होणाऱ्या कार्यक्रमाचे संपूर्ण वेळापत्रक दीपक बिडकर आणि शिवराज नाईक यांनी तयार केले. संकलन आणि जमा खर्च हिशोब महेश घटे यांच्याकडे देण्यात आले होते. तर शर्मिला जोशी ,अर्चना टेहरे, यांनी मुलींशी संपर्क केला. व आपल्या गुरुजनांना आमंत्रण देण्याची जबाबदारी या दोघींनी सांभाळली ३०जुलै रोजी सकाळी ९ वा. सर्वजण शाळेच्या प्रांगणात जमा झाले. मुले ,व मुली सर्वांना फेटे बांधले. अंकुश गरड यांनी सर्वांना नाश्ता वितरित केला. नंतर शाळेच्या विद्यार्थ्यांनी नीसर्वांचे औक्षवंत केले. त्यावेळी शिकवणारे शिक्षक आणि विद्यार्थी सर्वांना लेझीम पथक बँड पथकाने वाजत गाजत सभा मंडपात आणले. सर्वात प्रथम दीप प्रज्वलन आणि सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर दीपक बिडकर यांनी जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा हे गीत सादर केले. शिवराज नाईक यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यानंतर गुरुजनांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री डी. ए .भंडे एस .ए .कुलकर्णी डी .के. शिंदे बी.बी .देशमुख एस. ए .देशमुख जे.ई. शिंदे के. पी .पांढरे बी.बी .कांबळे आर .बी .वांगीकर, आदींची उपस्थिती होती. सर्व गुरुजनांना विद्यार्थ्यांच्या वतीने उपहार स्वरूप भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी मनीष पंडित, शांती लिंग काळे, गीतांजली मुधोळकर, सुनील लोंढे, ह .भ .प. दिनकर धोंड. परमानंद गिरी महाराज. यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात मनोरंजन आणि धमाल मस्ती करण्यात आली. गीतांजली मुधोळकर आणि दीपक बिडकर यांनी म्युझिकल फिश पॉड चा कार्यक्रम घेऊन अनेक खोडकर विद्यार्थ्यांना मंचावर येऊन नाचायला भाग पाडले. तर काहीजण खाली प्रेक्षकांमध्ये मनमुराद नाचून आनंद लुटत होते. यावेळी पाहुणे म्हणून आलेल्या अँड बी.बी .तळेकर यांनी एक सुंदर कव्वाली सादर केली. गणेश शिंगणे यांनी तबल्याची साथ दिली आणि दीपक बिडकर यांनी त्यांना साथ संगत दिली. नंतर सर्वांनी झिंगाट गाण्यावर ताल धरला. तीस वर्षानंतर सर्व मित्र मनसोक्त नाचले. गंगा आहेरकर हिने विद्यालयाचा फलक तयार करण्यासाठी १०-००० ह. रु. भेट दिले. सर्व वर्गात डिजिटल बोर्ड माजी विद्यार्थी करणार आहेत. आभार प्रदर्शन अर्चना टेहरे हिने व्यक्त केले सूत्रसंचालन शिवराज नाईक यांनी केले .याप्रमाणे पाथरीच्या नेताजी सुभाष शाळेतील तीस वर्षानंतर स्नेह मिलनाचा कार्यक्रम पार पडला.
.


