राजआनिल पोचमपल्लीवार
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
आलापल्ली – येथील राणी दुर्गावती विद्यालयात नवीन शैक्षणिक सत्र: 2021-22 मधील इयत्ता 8 वी ते 10 वी चे वर्ग सुरू करण्यात आले. याप्रसंगी नवागतांचे स्वागत हा कार्यक्रम घेण्यात आला.
अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक गजानन लोनबळे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून ग्राम पंचायत आल्लापल्लीचे सरपंच शंकर मेश्राम, प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच विनोद आकनपल्लीवार, सदस्य स्वप्नील श्रीरामवार, सोमेश्वर रामटेके, मनोज बोल्लूवार,उपस्थित होते. शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सरवर शेख ,उषा गजभिये, पिंकी हलधर, तसेच साई पदमगिरीवार, उपस्थित होते. कोविडच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यानी घ्यावयाची काळजी, स्वच्छता, सामाजिक अंतर, मास्कचा वापर, यांचा वापर करून आपण सुरक्षित राहावे आणि इतरांनाही सुरक्षित ठेवता येते तसेच कोरोनासारख्या आजाराला समाजातून हद्दपार करता येते. सर्वानी प्रयत्न केले तरच आपले गाव कोरोनामुक्त करू शकतो असे आवाहन प्रमुख मार्गदर्शक शंकर मेश्राम यांनी केले. अतिथींच्या हस्ते विद्यार्थ्याना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. मुख्याध्यापक गजानन लोनबळे यांनी कोविडपासून वाचायचे असेल तर आपण स्वतःवर काही बंधने घालून घेतली पाहिजेत, गर्दी न करता दूर राहिले पाहिजे, सार्वजनिक ठिकाणी किंवा इतर कार्यक्रमातही सामाजिक अंतर, मास्क, हात स्वच्छ धुणे या त्रिसूत्रीचा वापर करण्याचे आवाहन केले. इतर मान्यवरांनीही विद्यार्थ्यानी या माहितीचा उपयोग पालक आणि समाजातील इतर घटकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले. संचलन गणेश पहापळे यांनी तर आभार प्रदर्शन श्रीनिवास कारेंगुलवार यांनी केले. यशस्वीतेसाठी ज्ञानेश्वर गोबाडे,जाहिद खान, प्रदीप दुधबावरे,, ख्याती कश्यप, हेमलता धाबेकर, सत्येंदर सिलमवार, आरती गेडाम, सोहेल शेख, रुपेश जाकेवार, भीमराव निमसरकार, सचिन मेश्राम, शंकर चालूरकर, शांत मांडोरे, यांचे सहकार्य लाभले .











