अजिंक्य मेडशीकर
तालुका प्रतिनिधी मालेगांव
देशात कोरीना मुळे हाहाकार माजविला आहे अन् त्यातच कोरोणा काळात हाताला काम नाही, युवकाच्या नौकऱ्या गेल्या, कोरोणा माहामारीमुळे लोक आर्थिक अडचणी आले. तरी पंतप्रधान मोदी साहेबांनी निवडणुकीपूर्वी जनतेला महागाई कमी करू व दोन करोड युवकांना दरवर्षी रोजगार देऊ अशा घोषणा केल्या होत्या. परंतु आज त्यातली एक घोषणा कमी न करता उलट महागाई वाढवली आणि रोजगार कमी केला. त्यामुळे आज लोकांना उपासमारीची वेळ आले व आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. गरीब जनतेला उज्वल योजना मार्फत शंभर रूपयात गॅस सिलेंडर देऊन आता या गरीब जनतेची थट्टा उडवली आहे.यातच पंतप्रधान मोदीनी पेट्रोल, डिझेल, गॅसच्या किमंती भरमसाठ वाढविल्या या सर्व किमंती कमी कराव्या व महागाई नियंत्रणात आणावी अन्यथा प्रहार संघटना तीव्र आंदोलनाचा ईशारा प्रहार महासंघाचे जिल्हा संघटक विजय शेंडगे यांनी दिली आहे तर या वेळी तालुका अध्यक्ष रविभाऊ घुगे, जगदीश मानकर, प्रविण घुगे, जिवन जाते उपस्थित होते.











