योगेश्वर शेंडे
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर
नागभीड (१५ जुलै)- नागभीड तालुक्यातील तळोधी बा येथून जवळच असलेल्या येनोली माल येथील गट ग्राम पंचायत ला खोजराम मरस्कोले जि. प.सदस्य यांच्या निधीतून येनोली माल येथील स्मशानभूमीला जनसुविधा अंतर्गत जिल्हा निधी मधून 7.50 लक्ष रुपयांची येनोली माल येथील स्मशानभूमीला लोखंडी जाडीचा वॅल कंपाऊंड मंजूर करून आज त्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी खोजराम मरास्कोले जिल्हा परिषद सदस्य, प्रफुल खापर्डे सभापती पंचायत समिती नागभीड,प्रमोद जुमनाके,नानाजी भाकरे माजी पोलीस पाटील,अमोल बावनकार सरपंच, श्री इंदूरकर ग्राम पंचायत सदस्य,रामदास बोरकर ग्राम पंचायत कर्मचारी,आनंदराव सोनवाणे ग्राम पंचायत कर्मचारी व आदी उपस्थित होते.