डॉ.शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी
परभणी.
सेलू परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कापूस, तूर ,सोयाबीन, मूग हि पिके घेतली जातात. गेले दोन-तीन महिन्यापासून पाऊस जेमतेम पाऊस पडल्यामुळे त्याच पाऊसावर शेतकऱ्यानी कशी बशी पेरनी करून घेतली.पाऊस आज उद्या पडेल या आशेवर शेतकरी आस लावून बसला आहे.तालुक्यात अनेक गावामध्ये पाऊस हा अत्यंत कमी आहे जुल्ले अगस्ट मध्ये दरवर्षी दमदार पाऊस पड़त असतो.परन्तु ऑगस्ट महीना अर्धा संपला तरी पाऊसाने दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून पावसाच्या आशेने पावसाची वाट पाहत आहेत. गेले दोन महिन्यापासून पाऊस नसल्यामुळे पिके कोमजू लागले आहेत. काही शेतकऱ्यावर दुबार पेरणीची वेळ आली आहे. शेतकऱ्यांनी सावकाराकडून पैसे काढून लागवड पेरणी केली आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांनी रासायनिक खते घेऊन ठेवले आहेत. परंतु पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांची पिके हातातुन जाऊ राहिले आहेत. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. काही ठिकाणी पिके पावसाअभावी जळुन चालले आहेत. येत्या सात ते आठ दिवसात पाऊस पडला नाही तर परिस्थिति अत्यंत खराब होऊ शकते. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाने गतवर्षी जाहिर केलेल्या अनुदानाचे पैसे अध्याप पर्यन्त खात्यात जमा झाले नाही.परिणामी शेतकरी हवालदिल झाला आहे.









